चेंबूर येथे कालिमातेच्या मंदिरातील मूर्तीला मदर मेरीचे कपडे परिधान केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या कालीमातेचे रूप आणि नंतर मदर मेरीचे कपडे घातल्यानंतरचे रूप असे व्हीडिओ समोर येत असून त्यावरून संताप व्यक्त होत आहे.
यासंदर्भात त्या मंदिरातील पुजाऱ्याने असा दावा केला की, त्याच्या स्वप्नात देवी आली आणि तिने या मूर्तीला मदर मेरीचे कपडे घालण्यास सांगितले. म्हणून आपण तसे केले.
हे ही वाचा:
“… म्हणून दुबई एअर शोमध्ये अंतिम प्रात्यक्षिक करणार नाही!” अमेरिकन पायलट काय म्हणाले?
हम तुम जुदा ना होंगे…अलविदा धर्मेंद्र
पाच वर्षांच्या साईशा देवलची मल्लखांब स्पर्धेत सोनेरी चमक
“सिंध भारतात परत येऊ शकतो, सीमा बदलू शकतात”
याबाबत हिंदू संघटनांनी मंदिरात धाव घेऊन जाब विचारला. हा प्रकार चेंबूरच्या स्मशानभूमीत असलेल्या कालीमंदिरात घडला. रमेश नावाच्या पुजाऱ्याने नंतर स्वप्नात देवी आली आणि तिने काय सांगितले ते कथन केले.
यासंदर्भात पुजाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पुजाऱ्याला पैसे देऊन हे कृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ या संघटनांनी आरती करून परिसर पवित्र केला.







