इराण – अमेरिका युद्ध झाल्यानंतर इराणचे नेते अयातुल्ला खामेनी यांचे त्यात निधन झाले. त्यावेळी भारतातील काही मुस्लिमांनी प्रचंड दुःख व्यक्त केले होते. इराणच्या झालेल्या नुकसानानंतर त्यासाठी इथे काही लोकांनी पैसेही जमवले. भारताने इराणच्या समर्थनार्थ भूमिका घ्यावी, अशी संतप्त मागणीही इथे काही मुस्लिम करत होते. काही मुस्लिमांनी तर इराण हा आमचा देश आहे, आमचे नेते खामेनी आहेत, मोदी नाहीत अशी टोकाची भूमिका घेतली.
आता लखीमपूर, उत्तर प्रदेशमधील मोहम्मद मुबारक याचा एक व्हीडिओ समोर आला आहे. यात हा इसम भारतावर इराणने क्षेपणास्त्र डागावे अशी मागणी करतो आहे. इराणने ही क्षेपणास्त्रे डागली तर मोदी इथून पळून जातील असे हा इसम व्हीडिओत म्हणत आहे. यासंदर्भात खेरी पोलिसांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे की, तक्रार दाखल झालेली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे.
हे ही वाचा:
नीट पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा!
बंगालच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, ३५ मंत्र्यांनी घेतली शपथ
पहलगाम हल्ल्याआधीच सक्रिय झाले फोन; पाकिस्तानी बँकेचे कनेक्शन
मे २०२६ मध्ये युपीआयचा नवा विक्रम; २३.२० अब्ज व्यवहारांची नोंद
हा इसम या व्हीडिओत काय म्हणतोय हे पाहूया
‘इराणच्या लोकांना माझे आवाहन आहे की, भारतातल्या मुस्लिमांवर मोदी खूप जुलूम करत आहेत. भारतात जेवढे मुसलमान आहेत, ते सगळे मोदींमुळे त्रस्त आहेत. मोदींना हटवता येत नाहीए, ते खुर्ची सोडतही नाहीत, त्यांना कोण हटवू शकते? कुणीही त्यांना हटवू शकत नाही, कारण सगळे सामील आहेत. मोदींनी सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना रस्त्यावर आणले आहे. अंबानी, अदानी यांना मोठे केले.
त्यामुळे आमची हात जोडून अशी प्रार्थना आहे की, आमच्या भारतावर ५०० मिसाईड डागा. ज्यामुळे मोदींना पळायला जागा राहणार नाही. किमान ५-६ हजार मिसाईल तरी भारतावर सोडा.’
