24 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरविशेषनागराज मंजुळे आता डॉक्टर नागराज मंजुळे!

नागराज मंजुळे आता डॉक्टर नागराज मंजुळे!

Google News Follow

Related

प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतर डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून नागराज मंजुळे यांचा मोठा सन्मान करण्यात आला आहे. नागराज मंजुळेंच्या नावापुढे आता डॉक्टर हे बिरुद लागणार आहे. त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. नागराज मंजुळे यांचे मित्र प्रा. हनुमंत लोखंडे यांनी फेसबुकवर याबाबतची माहिती दिली आहे.

“तुमच्या अशा चांगल्या दिवसांसाठी नेहमीच आशा होती. त्या दिवसांमध्ये एम.फिल किंवा SET/NET परीक्षांवर मात करण्यासाठी पुणे विद्यापीठात चकरा मारतानाचे तुमचे दिवस आठवतात,” असे लोखंडे यांनी म्हटले आहे.

चार्ली चॅप्लिन यांचे उदाहरण लोखंडे यांनी दिले आहे. तसेच नागराज मंजुळे यांच्याविषयी ते म्हणाले की, तुम्ही अपयशाच्या झळा सोसत होता पण संघर्षापुढे तुम्ही कधीही हार मानली नाहीत. तुमचा इयत्ता दहावी सोडल्यापासून ते डी. लिटपर्यंतचा प्रवास एक अविश्वसनीय आणि स्वप्नवत आहे. “अनेक प्रतिष्ठित चित्रपटांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांद्वारे सन्मानित झाल्यानंतर आता डी. वाय. पाटील विद्यापीठाद्वारे तुम्हाला डॉक्टर ऑफ लेटर्स (D. Litt.) ही मानद पदवी प्रदान करण्यात येत आहे आणि याचा साक्षीदार होणे हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे,” असेही लोखंडे म्हणाले.

हे ही वाचा:

सरनाईकांचे २ फ्लॅट आणि भूखंड जप्त

“तेजस ठाकरेसुद्धा ‘त्या’ कंपनीत पार्टनर” किरीट सोमय्यांचा दावा  

बायज्यूजकडे फिफा फुटबॉल विश्वचषकाचे प्रायोजकत्व

पेनड्राईव्ह बॉम्बवरून राऊतांची आगपाखड 

दरम्यान, नागराज मंजुळे यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. नागराज मंजुळे यांनी पिस्तुल्या, फॅंड्री, सैराट आणि झुंड असे एकाहून एक हिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. चित्रपटांची निर्मिती करत त्यांनी लेखन, दिग्दर्शनासह अनेक चित्रपटांमधून अभिनय देखील केला. मराठी चित्रपटाच्या इतिहासात १०० कोटींचा टप्पा पार करणारा सैराट हा पहिला चित्रपट ठरला होता. त्याआधी फँड्री सिनेमाची देखील खूप चर्चा झाली होती. फँड्री या चित्रपटासह पिस्तुल्या या शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा