26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरविशेषव्हायरल व्हिडिओमध्ये नाना? चित्रा वाघ यांच्या ट्विटवर कारवाईचा इशारा

व्हायरल व्हिडिओमध्ये नाना? चित्रा वाघ यांच्या ट्विटवर कारवाईचा इशारा

Related

गेल्या काही दिवसांपासून राजकीय आघाडीवर बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडत आहे. सध्या सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे ती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका कथित व्हिडिओची. या व्हिडिओमध्ये नाना पटोले चेरापुंजीमध्ये एका महिलेसोबत असल्याचे बघायला मिळत आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, काय, काय आयटम, नाना एकदम ओक्के असे या व्हिडीओ मध्ये म्हटले आहे. नेटकऱ्यांमध्ये या व्हिडिओची चांगलीच चर्च रंगली आहे. परंतु या व्हिडीओविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका महिलेच्या गळ्यात हात टाकला असल्याचा दावा या व्हिडिओबाबत केला जात आहे, परंतु हे निश्चितपणे सांगणे कठीण असले तरी यावर सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडिओत दिसत असलेल्या महिलेसोबत नाना पटोले असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. या व्हिडीओचे सत्य अद्याप समजू शकलेले नाही, मात्र नाना पटोले यांनी आपली बाजू मांडली आहे.

कायदेशीर कारवाई करणार

नाना पटोले म्हणाले, मी सध्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहे. पण सध्या राजकारणाची पातळी बरीच खाली गेली आहे, त्याचाच तो परिणाम आहे. हे काम करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत नाना पटोले यांनी या व्हिडीओवरचा दावा फेटाळून लावला आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चित्रा वाघ यांच्याबद्दल आम्हाला बोलायचे नाही, असे ते म्हणाले. आमची कायदेशीर टीम या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच सत्य बाहेर येईल, असे नाना पटोले म्हणाले.

हे ही वाचा:

आता ६० देशात विनाअडचण प्रवास करा!

द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार

महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

मलाही आश्चर्य वाटले

हा व्हिडिओ ट्विट करून नानांवर आरोप केल्यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या हा व्हिडिओ पाहून मलाही आश्चर्य वाटले. मी तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला. हा व्हिडिओ कोणा सामान्य माणसाचा नसून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओच्या सत्यतेबाबत मी नाना पटोले यांना ट्विट करण्यास सांगितले आहे, असे स्पष्टीकरण चित्रा वाघ यांनी दिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,921चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा