23.8 C
Mumbai
Monday, January 19, 2026
घरविशेषज्या मैदानावर गवत कापायचा, तिथे नाथन लायनने मॅकग्राचा विक्रम मोडला

ज्या मैदानावर गवत कापायचा, तिथे नाथन लायनने मॅकग्राचा विक्रम मोडला

Google News Follow

Related

क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची परंपरा अफाट आहे. शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा, डेनिस लिली… ही नावे केवळ विक्रमांची नाहीत, तर क्रिकेटमधील महानतेची प्रतीके आहेत. मात्र आता एडिलेड ओव्हलवर घडलेला एक क्षण इतिहासाची नवी पाने लिहिणारा ठरला आहे. कारण ज्या मैदानावर कधीकाळी तो गवत कापायचा, त्याच मैदानावर आज तो विक्रम मोडतो आहे!

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑफ-स्पिनर नाथन लायन आता देशाच्या कसोटी क्रिकेटमधील दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत, एडिलेड ओव्हलवर लायनने महान ग्लेन मॅकग्राचा विक्रम मोडत ऐतिहासिक कामगिरी केली.

ही कामगिरी लायनसाठी विशेष भावनिक ठरली, कारण याच एडिलेड ओव्हल मैदानावर तो कधीकाळी ग्राउंड्समन (क्युरेटर) म्हणून काम करत होता. आज ३८ वर्षांचा लायन ज्या मैदानावर गवत कापायचा, त्याच मैदानावर ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव कोरून गेला.

ब्रिस्बेन कसोटीत लायनला वगळण्यात आल्याने निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र एडिलेडमध्ये मैदानात उतरताच त्याने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवून दिली.

सामन्याच्या पहिल्याच दिवशी लायनने इंग्लंडचा फलंदाज ऑली पोप (३ धावा) बाद करत ग्लेन मॅकग्राच्या ५६३ विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी साधली. त्यानंतर काही क्षणांतच, बेन डकेटला अप्रतिम चेंडूवर क्लीन बोल्ड करत त्याने आपली ५६४ वी कसोटी विकेट पूर्ण केली.

या विकेटसह नाथन लायनने ग्लेन मॅकग्रा (५६३ विकेट्स) यांना मागे टाकले. आता ऑस्ट्रेलियन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लायनच्या पुढे केवळ शेन वॉर्न (७०८ विकेट्स) आहेत.

या कामगिरीमुळे लायन आता जागतिक कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे फक्त –

  • मुथय्या मुरलीधरन – ८००

  • शेन वॉर्न – ७०८

  • जेम्स अँडरसन – ७०४

  • अनिल कुंबळे – ६१९

  • स्टुअर्ट ब्रॉड – ६०४

माजी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांनी लायनच्या या यशाचं कौतुक करताना म्हटलं,

“कल्पना करा, काही वर्षांपूर्वी तो याच मैदानावर गवत कापण्याच्या मशीनवर बसायचा आणि आज त्याने महान मॅकग्राला मागे टाकलं आहे. हा प्रवास अविश्वसनीय आहे.”

लायनच्या घातक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यावर आपली मजबूत पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ३७१ धावांच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात इंग्लंडची अवस्था १२४ धावांत ४ विकेट्स अशी संघर्षमय झाली आहे.

गवत कापणाऱ्या कामगारापासून विक्रम मोडणाऱ्या दिग्गजापर्यंत… नाथन लायनचा हा प्रवास केवळ क्रिकेटचा नाही, तर जिद्द, संयम आणि स्वप्नांच्या सत्यात उतरल्याची कहाणी आहे!

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा