33 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेषगृहनिर्माण संस्थांच्या विविध प्रश्नांसाठी सोमवारी राष्ट्रीय अधिवेशन

गृहनिर्माण संस्थांच्या विविध प्रश्नांसाठी सोमवारी राष्ट्रीय अधिवेशन

सहकार भारतीचे आयोजन, देशभरातील प्रतिनिधी उपस्थित राहणार, तयारी पूर्ण

Google News Follow

Related

सहकार भारतीच्या वतीने गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या चेंबूरमध्ये एक दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे गृहनिर्माण मंत्री हरिदीपसिंग पुरी, केंद्रीय सहकर राज्यमंत्री बी. एल. वर्मा, मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे या अधिवेशनासाठी उपस्थितीत राहणार आहेत. या अधिवेशनासाठीची तयारी पूर्ण झाली असून अधिवेशनासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यानी उपस्थित राहावे, असे आवाहन सहकार भारतीच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा..

आसाममधील अमृतपाल सिंगच्या कोठडीत स्पायकॅम पेन, फोन!

‘सीता’ सिंहीण आणि ‘अकबर’सिंहाच्या एकत्र राहण्यास विरोध!

गीतकार गुलजार आणि जगद् गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार!

संदेशखाली अत्याचार प्रकरण; तृणमूल नेत्याला अखेर अटक!

गृहनिर्माण संस्थांचे देशाच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. मात्र या गृहनिर्माण संस्था सध्या विविध समस्यांचा सामना करत आहे. या समस्यांवर उपाययोजना, मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारकडे संगठीतपणाने हे प्रश्न मांडण्याची गरज आहे. याच हेतूने या राष्ट्रीयस्तरावरील महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या अधिवेशनात सहकार भरतीचे राष्ट्रीय स्तरावरील तसेच राज्य स्तरावरील प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार असून त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.

चेंबूर येथील फाईन आर्ट्स कल्चरल सोसायटी, चेंबूर मोनो रेल्वे स्थानकाजवळ या अधिवेशनाचे आयोजन सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार स्वागताध्यक्ष असून राष्ट्रीय अध्यक्ष दिनानाथ ठाकूर, राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, गृहनिर्माण प्रकोष्ठचे राष्ट्रीय प्रमुख मुदित वर्मा, यशवंत सावंत, राहुल पाटील, सुजित झा, भूषण पैठणकर, मंगेश पवार, विजय शेलार यावेळी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी या अधिवेशानासाठी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, या क्षेत्रात काम कारणारे कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहकार भरतीच्या वतीने करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा