32 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरविशेषनवी मुंबई देशातील सर्वात स्वच्छ शहर

नवी मुंबई देशातील सर्वात स्वच्छ शहर

स्वच्छ सर्वेक्षणात सूरत दुसऱ्या क्रमांकावर

Google News Follow

महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये नवी मुंबईने देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान पटकावला आहे. या क्रमवारीत गुजरातमधील सूरतने दुसरा, तर आंध्र प्रदेशातील विजयवाड्याने तिसरा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे, मागील सर्वेक्षणात नवी मुंबई तिसऱ्या स्थानावर होते. यंदा दोन स्थानांची झेप घेत शहराने अव्वल क्रमांकावर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे स्वच्छता व्यवस्थापनाच्या बाबतीत नवी मुंबईने देशातील प्रमुख शहरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सर्वेक्षणाचे यंदा दहावे वर्ष होते. देशभरातील हजारो शहरांचे स्वच्छता व्यवस्थापन, घनकचरा संकलन आणि प्रक्रिया, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती, कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट तसेच नागरिकांचा सहभाग अशा विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. शहरांमधील स्वच्छतेची प्रत्यक्ष परिस्थिती तपासण्याबरोबरच नागरिकांचे अभिप्राय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीलाही महत्त्व देण्यात आले.
हे ही वाचा:
मूडीजकडून भारताच्या आर्थिक विकासदराचा अंदाज वाढवला

दिवा रेल्वे फाटक तब्बल २५ मिनिटे खुले

…आणि इंदिरा गांधी-मनेका यांच्यात उडू लागले खटके

कुलगाममध्ये बाईकवरून आलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांना केले लक्ष्य

यंदाच्या सर्वेक्षणात विविध विशेष श्रेणींमध्येही शहरांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नदीकिनारी वसलेल्या स्वच्छ शहरांच्या श्रेणीत मध्य प्रदेशातील रीवा शहराने प्रथम क्रमांक मिळवला, तर बिलासपूर आणि वाराणसी यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्वतंत्र श्रेणीत ग्रेटर विशाखापट्टणम अव्वल ठरले. जबलपूरने दुसरा, तर लखनऊने तिसरा क्रमांक मिळवला. या निकालांमधून देशातील विविध शहरांमध्ये स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या स्पर्धात्मक प्रयत्नांचे चित्र स्पष्ट झाले आहे.

२०१६ मध्ये केवळ ७३ शहरांपासून सुरू झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचा विस्तार आता देशभरातील हजारो शहरांपर्यंत पोहोचला आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर, सार्वजनिक स्वच्छता आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यावर सातत्याने भर दिला जात आहे. नवी मुंबईला मिळालेला पहिला क्रमांक हा महापालिकेच्या नियोजनबद्ध प्रयत्नांसोबतच नागरिकांच्या सहभागाचाही गौरव मानला जात आहे. मात्र, देशातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब मिळवण्यापेक्षा तो कायम राखणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा