संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठा दावा केला आहे की, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी बाबरी मशीद बांधण्यासाठी सार्वजनिक निधीची मागणी केली होती, परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी ही योजना पुढे जाण्यापासून रोखली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये ‘युनिटी मार्च’ला संबोधित करताना केंद्रीय मंत्र्यांनी हा दावा केला आहे.
“पंडित जवाहरलाल नेहरूंना सार्वजनिक निधी वापरून बाबरी मशीद बांधायची होती. जर कोणी या प्रस्तावाला विरोध केला तर ते गुजराती मातेच्या पोटी जन्मलेले सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यांनी सार्वजनिक निधी वापरून बाबरी मशीद बांधू दिली नाही,” असे राजनाथ सिंह म्हणाले. ते पुढे म्हणाले की जेव्हा नेहरूंनी गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा पटेल यांनी स्पष्ट केले की, मंदिराचा विषय वेगळा आहे कारण त्याच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक असलेले ३० लाख रुपये जनतेने दान केले होते.
“एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला होता, आणि या (सोमनाथ मंदिर) कामावर सरकारच्या पैशांपैकी एकही पैसा खर्च करण्यात आला नव्हता. त्याचप्रमाणे, अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी सरकारने एकही रुपया दिला नाही. संपूर्ण खर्च देशातील जनतेने उचलला. यालाच धर्मनिरपेक्षता म्हणतात,” असे ते पुढे म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी पुढे आरोप केला की, महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार सरदार वल्लभभाई पटेल यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतरच १९४६ मध्ये जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष झाले. सरदार पटेल पंतप्रधान होऊ शकले असते, पण त्यांनी कधीही त्यांच्या कारकिर्दीत कोणत्याही पदाची आस धरली नाही, असे सिंह म्हणाले. नेहरूंशी वैचारिक मतभेद असूनही, त्यांनी महात्मा गांधींना वचन दिल्यामुळे त्यांच्यासोबत काम केले.
हे ही वाचा..
पुतिन यांच्या भेटीपूर्वी भारत- रशियामध्ये ‘या’ लष्करी कराराला मिळाली मान्यता
“पाकिस्तानचे दावे हास्यास्पद!” भारताने फटकारले
त्रिपुरातून बाहेर जाताहेत अवैध स्थलांतरित
काशी तमिळ संगमम ४.० : तमिळनाडूहून वाराणसीला पोहोचणे सुलभ
“१९४६ मध्ये काँग्रेस अध्यक्षाची निवड होणार होती. समितीच्या बहुसंख्य सदस्यांनी पटेल यांचे नाव सुचवले होते. जेव्हा गांधीजींनी त्यांना नेहरूंना अध्यक्षपद स्वीकारण्याची आणि त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची परवानगी देण्यास सांगितले तेव्हा त्यांनी लगेचच तसे केले,” असे सिंह म्हणाले. कोणाचेही नाव न घेता, सिंग यांनी असा दावाही केला की काही राजकीय शक्तींनी पटेलांचा वारसा पुसून टाकण्याचा प्रयत्न केला होता. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे पटेल इतिहासात एक चमकणारा तारा म्हणून पुनर्संचयित झाले,” असे राजनाथ सिंह म्हणाले.







