27 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेषमुंबईच्या सेवेत दाखल होणार 'या' बस

मुंबईच्या सेवेत दाखल होणार ‘या’ बस

Google News Follow

Related

मुंबईमध्ये आता वर्षाच्या अखेरीस बेस्टच्या विशेष बस दाखल होणार आहेत. या बसेसमध्ये एका वेळी ९० प्रवासी बसू शकणार आहेत. पण या बसेस आहेत तरी कोणत्या ज्याबद्दल इतके कुतुहल आहे?

मुंबईच्या सेवेत ३ हजार ३०० इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. त्याकरताच आता १ नवीन ई-डबल डेकर खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सोमवारी जाहीर केले की, आता इलेक्ट्रिक डबल डेकर बसगाड्या चालवल्या जातील. एकूणच काय तर आता बहुतांशी बसेस येत्या काळात इंधनाशिवाय धावणार हे आता निश्चित झालेले आहे. डबल डेकर बस ही एकेकाळी मुंबईची शान होती. परंतु काही वर्षांपूर्वी मात्र या बसचा १२० वरून आकडा घसरला तो ४८ वर येऊन थांबला. येत्या काही महिन्यांमध्ये हेच प्रमाण आता २८ इतके होईल. बेस्टला सध्या नवीन डबल डेकर बस मिळविण्याची घाई लागलेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा हा आकडा १२० वर येईल.

हे ही वाचा:

काय आहे भारत-रशिया दरम्यानचा इंद्र-२१ युद्ध सराव?

…म्हणून गुजरातमधील शहराला मिळाला ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ चा दर्जा

बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री! शपथविधीचाही ठरला मुहूर्त

वर्ल्ड हेरिटेज साईट ठरलेल्या भारतातील मंदिराची काय आहे खासियत?

यासंदर्भात अधिक बोलताना लोकेश चंद्र म्हणाले, “आम्ही नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी आणि ई-डबल डेकर बसेससाठी निविदा आता मागविल्या आहेत. अशा बसेस परदेशात धावू शकतात तर आपल्याकडे का नाही असेही ते यावेळी म्हणाले. सध्याच्या घडीला अशा प्रकारच्य बसेस चीन, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सुरू आहेत.

डबल डेकर बस खरेदीचा खर्च हा तब्बल ६८ ते ७० लाख इतका असणार आहे. तर इलेक्ट्रीक असल्यास हा खर्च १५० टक्के वाढणार आहे. म्हणजेच जवळपास हा खर्च प्रत्येकी बसमागे १.७ कोटी इतका असेल. चंद्र म्हणाले, प्रत्येक बससाठी भांडवली खर्च जास्त असला तरी दीर्घकाळ देखभाल खर्च कमी असेल. यामध्ये एकावेळी 90 प्रवासी समाविष्ट होऊ शकतील इतकी आसनक्षमता आहे. त्यामुळे आता मुंबईच्या ताफ्यात लवकरच आपल्याला इलेक्ट्रीक बस दिसणार यात शंका नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा