देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा कहर चालू आहे. देशातील रुग्णवाढ भयावह गतीने होत आहे. त्याबरोबरच अत्यवस्थ रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा देखील करावा लागतो आहे. अशा वेळेत समाजमाध्यमांत जकात विभागाच्या ताब्यात तब्बल ३,००० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर असल्याची माहिती पसरली होती. परंतु केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अशा प्रकारे कोणतेही ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर जकात विभागाच्या ताब्यात नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयासमोर हा विषय आला होता. त्यावेळेला सरकारी समितीने अशा प्रकरचे कोणतेही कॉन्स्ट्रेटर नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. त्या बरोबरच सरकारतर्फे काढण्यात आलेल्या पत्रकात देखील हे स्पष्ट करण्यात आले होते.
हे ही वाचा:
मोदी सरकारचा मोठा निर्णय, ८० कोटी नागरिकांना मिळणार मोफत धान्य
आता व्हॉट्सऍपवर शोध जवळचे लसीकरण केंद्र
आदु… आता तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त
माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरी यांचे कोरोनामुळे निधन
या पत्रकात मंत्रालयाने असे देखील म्हटले की, या बाबतीतील अधिक माहिती ही प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून घेतली गेली आणि अशा प्रकारचे कोणतेही कॉन्सट्रेटर नसल्याचे कळले आहे. तरीही समाजमाध्यमांवर याबाबतचे फोटो असल्याने, ज्याने हे फोटो काढले आहेत, त्यांनी ही माहिती सरकारला द्यावी, जेणेमुळे त्यावर उचित कारवाई करता येईल.
केंद्र सरकारने यापूर्वी एका निर्णयाद्वारे परदेशातून येणाऱ्या ऑक्सिजनच्या सर्व प्रकारच्या उपकरणांवर जकात शुल्क माफ केले होते. भारत सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असल्याने मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ येऊ लागला आहे. विविध देशांनी भारताला मदत पाठवली आहे.