22 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरविशेषकोविन ऍपमधून लोकांची माहिती फुटल्याचे वृत्त खोटे!

कोविन ऍपमधून लोकांची माहिती फुटल्याचे वृत्त खोटे!

केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण

Google News Follow

Related

कोविन या कोविड लशीच्या ऍपमधून सर्वसामान्यांची माहितीची गळती झाल्याचा दावा करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की, हे ऍप पूर्णपणे सुरक्षित असून या ऍपमधून लोकांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करण्यात आल्याचा दावा निखालस खोटा आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य मंत्रालयाचे कोविन पोर्टल हे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याच्या माहितीसंदर्भातील सर्व सुरक्षिततेची काळजी घेण्यात आलेली आहे. केवळ ओटीपीच्या माध्यमातूनच माहिती उपलब्ध करून दिली जाऊ शकते, अन्य मार्गाने नाही.

राजकीय नेते, नोकरशहा आणि इतरांची माहिती टेलिग्राम या सोशल मीडियाच्या मंचावर उपलब्ध झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या माहितीत आधार कार्ड क्रमांक, निवडणूक ओळखपत्र, मोबाईल क्रमांक अशी माहिती जाहीर करण्यात आली होती. ज्यांनी लस घेतली होती त्यांची ही माहिती असल्याचे म्हटले जात होते.

हे ही वाचा:

सर्वाधिक विजेतीपदे जिंकणाऱ्या कोरियाला नमवले; भारताच्या ज्युनियर महिला अजिंक्य

बिपरजॉयचा फटका बसला; मुंबईत जुहू बीचवर सहाजण बुडाले

रॅम्प वॉक करताना लोखंडी खांब कोसळला; २४ वर्षीय मॉडेलचा मृत्यू

बृजभूषण सिंह म्हणतात, २०२४ची निवडणूक लढवणार, लढवणार, लढवणारच!

साऊथ एशिया इंडेक्सने यासंदर्भात ट्विटची मालिका तयार करून भारतात मोठ्या प्रमाणात माहितीची गळती झाल्याचा दावा करण्यात आला. पण केंद्राने यासंदर्भातील स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, वेब ऍप्लिकेशन फायरवॉल, अँटी डीडॉस, टीएलएस या आणि इतर सुरक्षाव्यवस्थांची काळजी घेण्यात आली आहे.

त्यानंतर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट करून सांगितले की, कोविन ऍप किंवा त्याच्या माहितीशी कुणीही छेडछाड करू शकत नाही. याआधी जर ही माहिती चोरण्यात आली असेल तर ती आज दाखविण्यात आली आहे. या ऍपमधून ती चोरण्यात आलेली नाही. राष्ट्रीय माहिती प्रशासन धोरणाअंतर्गत सगळी माहिती सुरक्षित ठेवली जाते.

तृणमूल काँग्रेसने दावा केला होता की, राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन, काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम, जयराम रमेश, केसी. वेणुगोपाल, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंग, राज्यसभेचे खासदार सुष्मिता देव, अभिषेक मनू संघवी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची माहिती बाहेर आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा