31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरसंपादकीयचॅट जीपीटी... सॅम अल्टमन यांचा मणिशंकर झालाय का?

चॅट जीपीटी… सॅम अल्टमन यांचा मणिशंकर झालाय का?

बाजारातील एकाधिकारामुळे अल्टमन यांच्या डोक्यात हवा गेलेली दिसते.

Google News Follow

Related

भारत चॅट जीपीटीसारख्या उत्पादनांबाबत आमच्याशी स्पर्धा अशक्य आहे, त्या दिशेने प्रयत्न करणेही निरर्थक आहे, अशी मुक्ताफळे चॅट जीपीटीची निर्मिती करणाऱ्या ओपन एआयचे संस्थापक सॅम अल्टमन यांनी उधळली आहेत. त्यांना बहुधा भारताचा इतिहास माहीत नसावा. किंवा अल्टमन यांचा बहुधा मणिशंकर अय्यर झाला असावा. ओपन एआयची निर्मिती असलेल्या चॅट जीपीटीची जगभरात चर्चा आहे. तुम्हाला हवं ते लिहून देणारे एप असे याचे वर्णन होऊ शकते. कवितांपासून नियुक्ती पत्रापर्यंत आणि निबंधापासून कोडींग पर्यंत काहीही हे चॅट जीपीची तुम्हाला देऊ शकते. आणि ही तर नुकती सुरुवात आहे. बाळाचे पाय अजून पाळण्यात आहेत. चॅट जीपीटीच्या वेबसाईटचा १०० दशलक्ष लोक वापर करीत आहेत. एका दिवसाला साधारण १३ दशलक्ष लोक वेबसाईटवर येतात.

 

बाजारात दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसात चॅट जीपीटीचे पाच लाख डाऊनलोड झाले, यावरून लोकांमध्ये याबाबत किती उत्सुकता आहे हे लक्षात येऊ शकते. ओपन एआयचे संस्थापक भारतात आल्यानंतर भारताचे पंतप्रधान त्यांना भेटीसाठी वेळ देतात, यावरून भारतासाठी त्यांचे महत्व अधोरेखित होते. परंतु बाजारातील एकाधिकारामुळे अल्टमन यांच्या डोक्यात हवा गेलेली दिसते.

 

भारतात एका कार्यक्रमात ‘भारतीय कंपन्या चॅट जीपीटीसारखी निर्मिती करू शकतात का? यासाठी सुरूवात कशी करावी’? असा साधा सरळ प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. चॅट जीपीटीच्या एकाधिकारशाही समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा प्रश्न बहुधा त्यांना सहन झाला नसावा. अल्टमन तिरमिरले, आमच्याशी स्पर्धा शक्य नाही. प्रयत्न करून पाहायला हरकत नाही, परंतु हे प्रयत्न निरर्थक ठरतील असे उत्तर दिले. संशोधन आणि विकासासाठी कोट्यवधी डॉलर गुंतवल्यानंतर एकाधिकारशाहीच्या माध्यमातून प्रचंड पैसा कमावणे हे या कंपन्यांचे उद्दीष्ट असते. भारतासारखा देश त्यांची मोठी बाजारपेठ ठरू शकतो, अशा वेळी भारतात जर पर्यायी उत्पादन निर्माण झाले तर कोट्यवधींच्या फायद्याला मुकावे लागणार, अशा विचारातून अल्टमन यांचे नकारात्मक उत्तर आले असणार हे निश्चित.

 

अल्टमनचे हे उत्तर भारताला कमी लेखणारे आहे. अमेरिकेतील कंपन्यांच्या डोक्यात भारत हा गारुड्यांचा देश असल्याचे चित्र अजूनही कायम आहे का, असा प्रश्न निर्माण करणारे हे उत्तर आहे. भारताशिवाय जगाच्या अर्थकारणाची कल्पनाच करता येणार नाही असा सध्याचा काळ आहे. जेव्हा ही परिस्थिती नव्हती तेव्हाही भारताने आपला जलवा दाखवला होता. ऐशीच्या दशकात अमेरिकेने भारताला सुपर कम्प्युटर देण्यास नकार दिला होता. १९९१ मध्ये भारताने विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम ८००० या स्वदेशी सुपर कम्प्युटरची निर्मिती केली. क्रायोजेनिक इंजिनाबाबत याची पुनरावृत्ती घडली. उपग्रह प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेली क्रायोजेनिक इंजिने देण्यास जेव्हा तमाम विकसित देशांनी नकार दिला तेव्हा भारताने ही इंजिने देशात बनवून दाखवली. गेल्या काही वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आपण स्वत:साठी आणि अन्य देशांसाठीचे उपग्रह बनवतोय, त्यांचे प्रक्षेपण करतो आहोत.

 

हे ही वाचा:

गेल्या १० वर्षांत भारताने जिंकले एकच आयसीसी अजिंक्यपद

कोविन ऍपमधून लोकांची माहिती फुटल्याचे वृत्त खोटे!

बृजभूषण सिंह म्हणतात, २०२४ची निवडणूक लढवणार, लढवणार, लढवणारच!

… म्हणून शुभमन गिलला भरावा लागणार दंड!

अल्टमन यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची आठवण झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी वक्तव्य केले होते. नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या कार्यालयासमोर चहा विकावा. चहावाला काय पंतप्रधान बनणार. पुढे काय झाले, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. अल्टमन यांच्या वक्तव्यात मणिशंकर अय्यर यांचा माज आहे.
असाच माज फोर्ड मोटर्सचे चेअरमन बिल फोर्ड यांनी १९९८ मध्ये रतन टाटा यांना दाखवला होता. टाटा मोटर्सचे वाईट दिवस होते. त्यामुळे ही कंपनी फोर्ड समुहाला विकावी असा प्रस्ताव घेऊन रतन टाटा त्यांना भेटायला गेले. वाटाघाटी दरम्यान बिल फोर्ड टाटांना तोंडाला येईल ते बोलले, ‘तुम्हाला काहीच कळत नसेल तर तुम्ही पॅसेंजर कारच्या निर्मितीत उतरलात तरी कशाला? तुमची कंपनी विकत घेऊन आम्ही तुमच्यावर उपकार करीत आहोत’.

 

टाटांना हे शब्द जिव्हारी लागले, दुखावलेल्या मनाने त्याच रात्री ते भारतात परतले. परंतु अवघ्या दहा वर्षात पारडे फिरले. टाटा मोटर्सचा कारभार रुळावर आला आणि फोर्डची चाके रुळावरून घसरली. लॅंड रोव्हर आणि जग्वार ही फोर्डची दोन उत्पादने पार रसातळाला गेली. कंपनी डबघाईला चालली. आता वेळ बिल फोर्ड यांच्यावर आली होती. नाक घासत त्यांना टाटा यांच्याकडे यावे लागले. लँड रोव्हर आणि जग्वार विकत घेण्यासाठी विनंती करावी लागली. टाटांना अपमानाचा बदला घेण्याची संधी होती. परतुं टाटांनी मोठ्या मनाचा परिचय दिला. कोणताही अपमान न करता हा सौदा पार पडला.
फोर्ड आणि अल्टमन यांच्यात फरक एवढाच आहे, कि फोर्ड यांनी टाटांना सांगितले होते. तुम्हाला काहीच कळत नसताना तुम्ही पॅसेंजर कारच्या निर्मितीत उतरलात कशाला? अल्टमन म्हणाले आमच्याशी स्पर्धा शक्य नाही, प्रयत्न कराल तर निरर्थक ठरेल.

 

याच वर्षाच्या मार्चमध्ये केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी इंडिया ग्लोबल फोरमच्या वार्षिक परीषदेत भारत लवकरच स्वत:चे चॅट जीपीटीची निर्माण करेल अशी घोषणा केली होती. बहुधा ती अल्टमन यांच्या कानावर आलेली नाही. अल्टमनना मणिशंकर माहीत असण्याची शक्यता नाही, परंतु त्यांना टाटा आणि फोर्ड यांचा किस्सा तर माहीत असायला हवा होता.
अल्टमन यांच्या विधानाचे पडसाद उमटणे स्वाभाविक होते. ज्यांच्या राजन आनंद यांनी अल्टमनना भारतीय कंपन्यांना कमी लेखू नका, असा इशारा दिला आहे.टेक महिंद्राचे सीईओ सीपी गुरनानी यांनी अल्टमन यांचा हा ट्वीटरवर व्हीडियो अपलोड करून चॅलेंज एक्सेप्टेड असा रिप्लाय दिलेला आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा