29 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरसंपादकीयमुंबईच्या सहा जागांवर मनसे फॅक्टर किती प्रभावी?

मुंबईच्या सहा जागांवर मनसे फॅक्टर किती प्रभावी?

बिनशर्त पाठींबा दिल्यामुळे हा मनसेचे कार्यकर्ते ताकदीने महायुतीसाठी काम करताना दिसतायत

Google News Follow

Related

मुंबई – ठाण्यात उबाठा शिवसेनेकडून मराठी विरुद्ध गुजराती असे वातावरण निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बहुधा केम छो वरळी आणि जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा… या घोषणांचा विसर पडलेला दिसतोय. महाराष्ट्र गुजरात्यांच्या घशात जाऊ दिला जाणार नाही, अशा पोस्ट फिरवल्या जातायत. अशा वातावरणात मराठी मतदारांचा कल कुठे असेल? मनसे फॅक्टर किती प्रभावी ठरणार? असा सवाल राजकीय पंडितांनाही पडतोय.

मुंबईत मराठी मतदाराच्या हाती विजयाच्या किल्ल्या राहणार आहेत. बाकीच्या मतदारांचा कल कुठे आहे हे स्पष्टपणे जाणवते आहे. परंतु मराठी मतदाराच्या मनाचा थांग लागत नाही. विशेष करून असे मतदार जे शिवसेनेचे परंपरागत मतदार आहेत. मुस्लीम मतदार मविआच्या बाजूने झुकलेला आहे. गुजराती, उत्तर भारतीय हा भाजपाचा परंपरागत मतदार आहे. मुंबईत मतांचा एकूण आकडा सुमारे ९६ लाख ५३ हजार १०० एवढा आहे, यापैकी ३६ लाख ३० हजार ६०० मतदार मराठी भाषिक आहेत. मुंबईत आपणच मराठीचे ठेकेदार आहोत, असे भासवण्याचा उद्धव ठाकरे कितीही प्रय़त्न करीत असले तरी त्यात तथ्य नाही.

मराठी मतांचा बऱ्यापैकी टक्का भाजपाकडेही आहे. तसे नसते तर २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला ८२ जागा मिळाल्या नसत्या. हा मतदार भाजपाचा जनसंघापासून चालत आलेला, संघाच्या मुशीत तयार झालेला मतदार आहे. परंतु मराठी मतदारांमध्ये असा एक मतदार आहे, जो मराठी या मुद्द्यावर वर्षोनुवर्षे शिवसेनेला मतदान करतो आहे. शिवसेनेची शकले झाल्यानंतर हा मतदार विभागला गेला.

मनसेला मानणाऱ्या मतदाराची मानसिकताही साधारण शिवसेनेच्या मतदारासारखीच आहे. हा असा मतदार आहे, ज्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्ववादी विचार आजही प्रेरीत करतात. जो मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात शिवसेनाप्रमुखांची छबी पाहातो. ज्याला शिवसेनाप्रमुखांचे वारसदार हे उद्धव नसून राज ठाकरेच आहेत, असे ठामपणे वाटते.

राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिल्यामुळे हा मनसेचे कार्यकर्ते ताकदीने महायुतीसाठी काम करताना दिसतायत. भाजपाकडे असलेला मराठी मतदार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेला मराठी मतदार आणि मनसेकडे असलेला मराठी मतदार एकवटल्यामुळे महायुतीचे समीकरण मजबूत होणार असे चित्र दिसते आहे.

ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात उबाठा शिवसेनेचे उमेदवार महायुतीच्या विरुद्ध लढतायत. उबाठा शिवसेनेने पूर्णपणे मुस्लीम मतांवर लक्ष केंद्रीय केलेले दिसतेय, उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल कीर्तिकर, जुहू गल्ली, बेहरामबाग, वांद्रे प्लॉट, पठाणवाडी अशा मुस्लीम वस्त्यांमध्ये जास्त जोर लावताना दिसत आहेत.

दक्षिण मुंबईसह इतर मतदार संघातही तेच चित्र आहे. रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे पाठ फिरवणारे उद्धव ठाकरे कट्टरतावादी मुस्लीमांना जवळचे वाटतायत. काँग्रेससारखे सेक्युलर वाटतायत. त्यामुळे ही मतं उबाठा शिवसेनेच्या पारड्यात पडणार हे निश्चित. दुसऱ्या बाजूला मराठी मतदारांना बाजूला वळवण्यासाठी सोशल मीडियावर मुंबई गुजरातच्या घशात घालू देणार नाही, अशा प्रकारचा प्रचार सुरू आहे. जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा करूनही गुजरात्यांची मतं मिळणार नाही, अशी खात्री झाल्यामुळे आता गुजरातवर शरसंधान करण्याचा कार्यक्रम ठाकरे आणि कंपनी राबवते आहे. मुंबई केंद्र शासित करण्याची कल्पना सर्वात आधी जवाहरलाल नेहरुंना सुचली. उद्धव ठाकरे यांचा पक्ष त्याच नेहरुंच्या काँग्रेससोबत नाचतायत. भाजपासोबत युती असल्यामुळे गुजराती समाजाची मतं शिवसेनेला मिळत होती. गुजराती मतांची भरपाई करण्यासाठी गेल्या चार वर्षापासून मुस्लीम मतांकडे ठाकरेंनी मोर्चा वळवलेला आहे.

मविआचे सरकार सत्तेवर आल्यापासून उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम मतांसाठी जी पेरणी केली होती, त्याचे पीक घेण्याची वेळ त्यांच्या दृष्टीने आलेली आहे. उबाठा शिवसेनेकडे असलेल्या मुस्लीम मतांसोबत मराठी मतं जोडली की विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो, असे गणित ठाकरेंनी मांडलेले आहे.

हे ही वाचा:

घाटकोपरमधील होर्डिग प्रकरण: भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात

अटल सेतूवरून जाताना ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंधाना म्हणते, भारत रुकेगा नही!

उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ योगी आएंगे आएंगे योगी आएंगे

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने गोळी झाडून केली आत्महत्या!

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण मविआला ३५ जागा मिळणार असे ठामपणे सांगतायत. त्याच्या मागे एकगठ्ठा मुस्लीम मतं आणि जोडीला मिळतील ती अन्य समाजाची मतं असे हे गणित आहे. उबाठा शिवसेनेने मराठी मतांना गृहीत धरलेले असताना मनसेने महायुतीला दिलेला बिनशर्त पाठींबा या समीकरणाच्या आड येतो आहे.
मविआला ३५ जागा मिळणार असे सांगणारे ठाकरे आणि पवारांना सहानुभूती असल्याचा दावा करतायत. परंतु एकही नेता असे म्हणत नाही की मविआच्या काळात जनतेसाठी केलेल्या कामामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाला मतदान होईल.

 

दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मुंबईत या चार लोकसभा मतदार संघात मनसेची बऱ्यापैकी ताकद आहे. ही मतं ठाकरेंनी गृहीत धरलेले समीकरण उद्ध्वस्त करणार अशी चिन्ह आहेत. १७ मे रोजी शिवतीर्थावर महायुतीचा मेळावा आहे. या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. हा मेळावा मुंबईतील उबाठा शिवसेनेची उरलीसुरली आशा संपुष्टात आणणार, अशी शक्यता आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा