चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंत फिट आहे की नाही, यावर चर्चा सुरू असतानाच, माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी पंतबाबत थेट आणि परखड मत मांडलं आहे – “जर पंत विकेटकीपिंग करू शकत नसेल, तर त्याने केवळ फलंदाज म्हणून देखील खेळू नये!”
तिसऱ्या कसोटीत खेळताना डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे पंत मैदानाबाहेर गेला होता. त्याच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलने विकेटकीपिंग केली. आता चौथ्या सामन्याआधी पंत पूर्णतः तंदुरुस्त होईल का, यावर अजूनही संभ्रम आहे.
शास्त्री ICC च्या व्हिडिओत म्हणाले,
“विकेटकीपिंग करताना हाताला थोडंसं संरक्षण असतं. पण फक्त क्षेत्ररक्षण करताना बोटाला पुन्हा मार बसण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे तो पूर्णपणे फिट नसेल, तर त्याने खेळू नये.”
भारतीय संघाचे कर्णधार शुभमन गिल आणि सहायक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी मात्र पंतला पुरेसा वेळ दिला जात असल्याचं सांगितलं. पण शास्त्रींचं स्पष्ट मत –
“खेळायचं असेल तर किपिंग आणि बॅटिंग दोन्ही करावं लागेल. अर्धवट भूमिका नको!”
आता पाहावं लागेल की ‘किपिंग नाय तर बॅटिंग नाय’ हे धोरण प्रत्यक्षात लागू होतं का, की टीम मॅनेजमेंट वेगळा निर्णय घेते!







