33 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेष६० वर्षांनंतर 'नोकिया'ने रंगरूप बदलले...

६० वर्षांनंतर ‘नोकिया’ने रंगरूप बदलले…

नोकियाने ६० वर्षांनंतर पहिल्यांदाच आपला लोगो बदलला

Google News Follow

Related

एकेकाळी नवीन मोबाइल कोणता विकत घेऊ रे? याचं उत्तर हमखास मिळायचे विचारायचे काय, नोकियाचा तुझ्या बजेटमधला फोन घेऊन टाक. अरे बिनधास्त डोळे झाकून घे, काळजी करू नकोस. नोकिया कंपनीच्या मोबाइलने मनावर अधिराज्य गाजविले होते, विश्वास मिळवला होता. सर्वांच्या हातात अगदी मालकापासून ते सेवकापर्यंत नोकियालाच पसंती मिळत होती. नोकियाच्या विश्वास अगदी त्या काळातील अंबूजा सिमेंटच्या जाहिरातीसारखी होता, ये दिवार तुटेगी कैसे, अंबुजा सिमेंट से जो बनी है. अगदी तसाच हा मजबूत ओळखला जाणारा फोन होता, तो म्हणजे नोकिया.

काळानुसार बदल करावा लागतो. वेगळेपण, काहीतरी नवे द्यावे लागते. परंतु नोकियाने बदल केले नाहीत. स्वतःला योग्यप्रकारे अपडेट केले नाही. त्याचाच फटका नोकियाला बसला आणि त्यांची पिछेहाट होऊन ते किंचित मागे पडल्याचे चित्र बाजारात दिसले. इतर नवीन कंपन्यांच्या तुलनेत सध्या नोकियाच्या मोबाइल फोनची विक्री कमी झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या कंपनीला ग्राहकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहायला मिळते आहे.

हेही वाचा :

केरळच्या मंदिरात आता झुलणार रोबोटिक हत्ती

संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवा!! NIAने केले मुंबई पोलिसांना सतर्क

व्हीपला आम्ही मानणार नाही, आम्ही घाबरत नाही… ठाकरे गटाचा पवित्रा

बाजारात इतर कंपन्यांनी बस्तान बसवल्यानंतर बदल अपेक्षित असतात याची जाणीव नोकियाला झाली असावी. त्याची सुरुवात म्हणून आपला जलवा दाखवण्यासाठी पुन्हा नव्या दमात बाजारात उतरतेय. नोकिया कंपनीने आपली नवीन ओळख करून देताना आपला आयकॉनिक लोगो लोगो बदलला आहे. नोकियाने ६० वर्षांनंतर पहिल्यांदाच आपला लोगो बदलला आहे. कंपनीने याबाबतची घोषणा केली आहे.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये नोकियाने आपला जलवा, ठसा उमटवला होता. नोकियाने ११०० पासून अनेक स्मार्टफोनची निर्मिती करून ग्राहकांना पुरवले आहेत. नोकियाचे ३३१०, ३२१०, ३५१०, ६०६०, २३००, ३२०० अशा अनेक मोबाइलने ग्राहकांना आपलेसे केले. नोकियाने विश्वास निर्माण करून ग्राहकांच्या मनात घर निर्माण केले. त्यामुळे नोकिया आणि ग्राहक यांच्या अतुट नात्यामुळे कंपनी घराघरात पोहोचली. ग्राहकांचा हाच विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी नोकियाने त्यांचा लोगो बदलून सुरुवात केली आहे. या नव्या लोगोमध्ये नोकिया या शब्दामधील प्रत्येक अक्षराच्या रचना एका खास शैलीमध्ये केल्याचे पाहायला मिळते. जुन्या लोगोमधील निळ्या रंगासह अन्य काही रंगांचा वापर करुन तयार केलेली नव्या रंगसंगती या लोगोमध्ये पाहायला मिळते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा