33 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024
घरदेश दुनिया'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा' म्हणून मोदींना भेटणार

‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा’ म्हणून मोदींना भेटणार

मराठी गौरव दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Google News Follow

Related

‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही करावी’ यासाठी राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान मोदी यांना भेटणार असल्याची ग्वाही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विधानसभेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार? यावर चर्चा झाली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मराठी भाषा गौरव दिनी विधानसभेत सांगितले आहे. पुढे मुख्यमंत्री शिंदे असेही म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांना शिष्टमंडळ भेटून त्यांना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याबाबत विनंती करणार आहे.

सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षांत घेऊन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटून मराठी भाषेला दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी विनंती सुद्धा करण्यात येणार आहे.  ‘आज मराठी भाषा गौरव दिन’ आहे त्यानिमित्ताने छगन भुजबळ यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्या विषयी मुद्दा उपस्थित केला , तेव्हा छगन भुजबळ म्हणाले की, आज कवी कुसुमाग्रज यांची जयंती आहे. गेली १४ वर्ष मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आपण प्रयन्त करत आहे.

हे ही वाचा:

मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

‘भगूर’ १५ दिवसात होणार पर्यटन स्थळ

काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, आणखी एक काश्मिरी पंडिताची हत्या

अजितदादा, ही पोटदुखी कशामुळे? शिंदे-फडणवीसांनी विचारला सवाल

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून चारही निकष आपली मराठी भाषा पूर्ण करते असे असून सुद्धा अजूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही . यासाठी लवकरात लवकर प्रयत्न होणे गरजेचे आहे असेही ते पुढे म्हणाले.  आशिष शेलार म्हणाले कि, आज मराठी भाषा गौरव दिन आहे. हा दिवस उत्साहात महाराष्ट्रासह जगभरात साजरा करतात. तर दिल्लीदरबारी या सर्व गोष्टी मांडल्या आहेत. यासाठी सर्व पक्षांनी एप्रिल महिन्यात या संदर्भात दिल्लीला जाऊन भेट घेतली पाहिजे.

राज्यात आपल्याकडे २७ फेब्रुवारी ला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर मराठी भाषिकांची संख्या आहे यात प्रामुख्याने एखाद्या भाषेबद्दल जिव्हाळा, आपुलकी जाणवते ती आपुलकी ची जाणीव मराठी भाषेला आहे. भाषा दिनाच्या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाकरे गटाकडून जागर मराठी भाषेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
141,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा