30 C
Mumbai
Thursday, March 23, 2023
घरक्राईमनामाकाश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, आणखी एक काश्मिरी पंडिताची हत्या

काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, आणखी एक काश्मिरी पंडिताची हत्या

संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा गोळीबार केला आहे. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित संजय शर्मा यांना लक्ष्य केले. गोळी लागल्याने तो खाली पडल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले. जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. या संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

पुलवामाच्या आचान भागात राहणारे ४० वर्षीय संजय शर्मा रविवारी काही कामासाठी बाजारात जात होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.  येथे संजय शर्मा हा बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा.

आचन येथील काशिनाथ शर्मा यांचा मुलगा संजय शर्मा स्थानिक बाजारपेठेत जात असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला.स्थानिक लोकांनी पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेले, मात्र त्याला वाचवता आले नाही.  रुग्णालयात  त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेबाबत भाजप नेते अल्ताफ ठाकूर म्हणाले की, पुलवामाच्या आचान येथील रहिवासी संजय शर्मा यांच्या हत्येचा मी निषेध करतो. सुरक्षा दल गुन्हेगारांना त्यांच्या अंतापर्यंत पोहोचवतील. कोणालाही शांतता भंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना ओमर अब्दुल्ला म्हणाले, ‘पुलवामा जिल्ह्यातील आचान येथील रहिवासी संजय पंडित यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. संजय हा बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो.

हे ही वाचा:

मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल

आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा

‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात

कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर

याआधी शुक्रवारी रात्री अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी माजी पंच आसिफ अली यांना लक्ष्य केले होते. नमाज अदा करून मशिदीतून परतणाऱ्या आसिफ अली गनई यांना जिल्ह्यातील बिजबिहारा भागातील हसनपोरा तवेला येथे दहशतवाद्यांनी गोळ्या घालून जखमी केले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,882चाहतेआवड दर्शवा
2,030अनुयायीअनुकरण करा
65,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा