27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरराजकारणमुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल

मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल

भागधारकच्या नावाखाली ४० कोटींची फसवणूक

Google News Follow

Related

कागल तालुक्याचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर आज अखेर कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या नावाखाली हजारोंच्या शेतकऱ्यांकडून त्यांनी प्रत्येकी पैसे देऊन एकूण त्यांनी ४० कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे. कोल्हापुरातील मुरगूड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कलम ४२० अंतर्गत भारतीय दंड संहिता अंतर्गत मुश्रिफ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली आहे.

 

काय आहे आरोप?
विवेक कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे की, कागल तालुक्यातील बेलवाडी काळम्मा इथल्या लोकसहभागातून साखर कारखाना उभा करण्याचे निश्चित करण्यात आले होते. हा साखर कारखाना उभा करण्यासाठी मुश्रिफांना भागभांडवलाची मोठ्या प्रमाणांत आवश्यकता होती. या भागभांडवलासाठी ज्ञात आणि घोषित उत्पन्न असणे गरजेचे होते. त्यातच हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याला सहकारी तत्वावर नव्याने परवानगी काढणे अशक्य होते. त्यामुळेच हसन मुश्रीफ यांनी लोकसहभागातून कंपनी कायद्यात हा साखर कारखाना उभा करण्याचे निश्चित केले आणि तसे आवाहनही केले.

मुश्रिफांच्या जवळाच्या कार्यकर्त्यांनी २०१२ साली व्यक्तिगत संपर्कातून कारखाना उभारण्यासाठी वेगवेगळ्या सभा आयोजित केल्या होत्या. शिवाय वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी भागधारक सभासद होण्यासाठी खुले आवाहनच केले होते. त्यापुढील चार ते पाच वर्ष तालुक्यातल्या लोकांना आणि संपर्कातील इतरही लोकांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये शेअर भांडवल उभे केले होते. पण हा कारखाना मुश्रीफ यांचे नातेवाईक , कुटुंबीय आणि संबंधित व्यक्ती अशा एकूण फक्त १७ व्यक्तींचाच असल्यामुळे खासगी आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची मांदियाळी

मोदींबाबत अपशब्द वापरणारे पवन खेरा शरण आले; मागितली बिनशर्त माफी

एनआयएची मोठी कारवाई, ८ राज्यात ७६ ठिकाणी छापे

दीड लाखांची ब्रँडेड चप्पल, महागड्या जीन्स.. गुंड सुकेश चंद्रशेखरची गजाआड मजा

फिर्यादी विवेक कुलकर्णी यांनी तक्रारीत पुढे म्हंटले आहे की, या कारखान्यात मला १०,००० रुपये रकमेचे भागधारक करून घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. तसेच भागधारक झाल्यास या साखर कारखान्यातून पाच किलो साखर हि नाममात्र रकमेमध्ये मिळणार असे सांगितले. नंतर लाभांशाच्या रूपात आर्थिक लाभही मिळतील असे आमिश दाखवण्यात आले त्याचप्रमाणे, मी त्यांना २०१२ मध्ये दहा हजार रक्कम रोख स्वरूपात दिले होते. त्याची लिखित स्वरूपात कोणतीच पावती देण्यात आली नाही. कारखाना सुरु झाल्यानंतर मला साखर कार्ड बिगर ऊस उत्पादक या नावाखाली एक कार्ड बनवून देण्यात आले. त्यावरती शेअर्स रक्कम १०,००० असे फक्त नमूद केले होते. या कागदाव्यतिरिक्त सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना लिमिटेड या कारखान्यातून कोणतेही ‘शेअर्स सर्टिफिकेट’ किंवा कुठलाच कागद अद्याप देण्यात आला नाही.  मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घर , कंपन्यांवर ईडी पथकाने बुधवारी छापे टाकून तब्बल १२ ते १४ तास कारवाई केली होती.

.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा