26 C
Mumbai
Thursday, March 30, 2023
घरविशेषमोदी सरकारच्या लॉकडाऊनमुळे वाचले 'लाख'मोलाचे जीव

मोदी सरकारच्या लॉकडाऊनमुळे वाचले ‘लाख’मोलाचे जीव

स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा अहवालात दावा

Google News Follow

Related

कोरोना काळात मोदी सरकारने केलेल्या लॉकडाऊनवर विरोधकांनी खूप टीका केली होती. परंतु लॉकडाऊन या एकाच कारणामुळे मार्च ते एप्रिल या काळात देशात ३४ लाख भारतीयांचे जीव वाचले आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठाने हा दावा केला आहे. रशिया, कॅनडा, फ्रान्स, इटली आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये ५० दिवसांतच कोरोना संसर्गाने अत्युच्च शिखर गाठले होते. परंतु भारतातील लॉकडाऊनमुळे कोरोनाची पहिली लाट अत्युच्च पातळीवर जाण्यासाठी १७५ दिवस लागले असे स्टॅनफोर्ड विद्यापीठाने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे कोरोनाचे नाव घेत सरकारच्या नावाने शिमगा करणाऱ्या विरोधकांना या दाव्यामुळे चांगली चपराक बसली आहे.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ‘हिटिंग द इकॉनॉमी: एस्टिमेटिंग द इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ इंडियाज लसीकरण आणि संबंधित उपाय’ या अहवालात ही वस्तुस्थिती अधोरेखित करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याहस्ते हा अहवाल प्रकाशित करण्यात आला .

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अहवालात, पहिल्या लॉकडाऊनपासून लसीकरणापर्यंत आणि त्यादरम्यान कृषी, एमएसएमई, गरीब, मजूर आणि इतर वर्गांसाठी वेळोवेळी जारी केलेल्या पॅकेजचे परिणाम यांचे तपशीलवार विश्लेषण करण्यात आले आहे. अहवालात कोरोनाच्या काळात मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेच्या आर्थिक परिणामांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात संपूर्ण सरकार आणि संपूर्ण जनतेच्या दृष्टिकोनातून काम करण्यात आले असे मांडवीया यांनी सांगितले.

केवळ लॉकडाउनच नाही तर सरकारच्या लसीकरण कार्यक्रमावरूनही अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यालाही स्टॅन्फोर्डच्या अहवालाने उत्तर दिले आहे. कोरोनाच्या काळात यशस्वी लसीकरण मोहिमेमुळे भारतात ३४ लाखांहून अधिक जीव वाचवणे शक्य झाले असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

हे ही वाचा:

मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल

आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा

‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात

कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर

अब्जावधी डॉलर्सचे नुकसान रोखण्यातही यश 
यशस्वी लसीकरण मोहिमेमुळे केवळ जीव वाचवण्यात यश आले नाही तर भारताची १८.३ अब्ज डॉलर्सच्या नुकसानीपासून बचत झाली लसीकरण मोहीम यशस्वी झाली नाही तर भारताला हे नुकसान सहन करावे लागले असते असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.अहवालानुसार, लसीकरण मोहिमेवरील खर्च वजा करूनही, भारताला या मोहिमेतून १५.४२ अब्ज डॉलर्सचा निव्वळ फायदा झाला.

भारतातील लसीकरण मोहीम सर्वात यशस्वी
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत केवळ जगातील विकसित देशांसोबतच देशात कोरोनाची लस विकसित करण्यात यशस्वी ठरला नाही, तर त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात आणि २२० कोटींपेक्षा जास्त डोस वितरित करण्यातही यशस्वी झाला. भारतातील लसीकरण मोहीम ही जगातील सर्वात मोठी आणि यशस्वी म्हणता येईल, ज्यामध्ये ९७ टक्के लोकांना एक डोस मिळाला आहे . त्याचबरोबर ९० टक्क्यांहून अधिक जणांना दोन्ही डोस मिळाले आहेत असे यात म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा