28.1 C
Mumbai
Sunday, October 11, 2026
घरविशेषआता निवृत्तीनंतरही ‘श्वान जवान’ पोलिसांसोबतच राहणार

आता निवृत्तीनंतरही ‘श्वान जवान’ पोलिसांसोबतच राहणार

मुख्यमंत्री फडणवीसांचा संवेदनशील निर्णय

Google News Follow

Related

पोलिसांच्या सेवेत तब्बल १० वर्षे योगदान देणाऱ्या श्वानांना निवृत्तीनंतर वेगळं करण्याची गरज भासणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत संवेदनशील निर्णय घेतला आहे. आता निवृत्त झाल्यानंतरही हे श्वान पोलीस दल आणि त्यांच्या हँडलर्ससोबतच राहणार आहेत. त्यांच्या अन्नासह इतर आवश्यक खर्चाची जबाबदारी गृह विभाग घेणार आहे.

पोलीस दलात बॉम्ब शोधणे, अमली पदार्थांचा शोध घेणे, गुन्ह्यांचा तपास आणि विविध सुरक्षा मोहिमांमध्ये श्वानांची महत्त्वाची भूमिका असते. साधारण १० वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर पोलीस श्वान निवृत्त होतात. यापूर्वी निवृत्त झालेल्या श्वानांना अनेकदा इतर ठिकाणी दत्तक देण्यात येत असे. मात्र, आपल्या हँडलर आणि परिचित वातावरणापासून दूर गेल्यामुळे काही श्वानांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले होते. काही निवृत्त श्वानांनी नवीन ठिकाणी गेल्यानंतर अन्न खाण्यासही नकार दिल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलीस सेवेत अनेक वर्षे काम केल्यानंतर या प्राण्यांना पुन्हा अनोळखी वातावरणात पाठवणे योग्य नसल्याची भूमिका घेण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयामागील संवेदनशील बाजू स्पष्ट केली. ज्या श्वानाने तब्बल १० वर्षे पोलीस दलासाठी सेवा बजावली, त्याला निवृत्तीनंतर त्रास सहन करावा लागू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. अशा श्वानांची योग्य काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्या आयुष्याचा उर्वरित काळ आरामात जाऊ दिला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

रशियन तेल टँकर प्रकरणात भारतीय कॅप्टनला ब्रिटनमध्ये अटक

संभल हिंसाचारातील सूत्रधार शारिक सट्टाविरोधात रेड कॉर्नर नोटीस

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’आधी पुण्यात राडा

“होर्मुझ आता अमेरिकेचा प्रदेश” ट्रम्प यांचा पुनरुच्चार

नव्या निर्णयानुसार, १० वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पोलीस श्वान सक्रिय कर्तव्यातून निवृत्त होतील. मात्र, त्यांना पोलीस दलापासून वेगळे केले जाणार नाही. ते आपल्या परिचित हँडलर्ससोबतच राहू शकतील. या श्वानांच्या अन्नाचा आणि इतर आवश्यक खर्चाचा भार गृह विभाग उचलणार आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांच्या देखभालीची आर्थिक जबाबदारीही पोलीस दलावरच राहणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा