28 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरविशेषसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे घामोळ्याच्या पावडरला फुटला घाम

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे घामोळ्याच्या पावडरला फुटला घाम

ही पावडर कॉस्मेटिक असल्याचा निष्कर्ष, किमती वाढणार

Google News Follow

Related

घामोळ्यांवरील उपचारासाठी वापरली जाणारी ‘नायसिल’ पावडर ही ‘औषधी पावडर’ नसून कॉस्मेटिक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. त्यामुळे अप्रत्यक्ष कर कायदा आणि सध्याच्या गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) तरतुदींनुसार कॉस्मेटिक वस्तूंना अधिक कर भरावा लागत असल्याने आता नायसिल पावडरच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे अंतिमत: ग्राहकांकडूनच ही किंमत वसूल केली जाणार आहे.

होमिओपथी केसाच्या तेलाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने अनुकूल निर्णय दिल्याच्या एक दिवसानंतर हा निकाल आला आहे. अश्विनी होमियो अर्निका हेअर ऑइल हे सर्वसामान्य चाचणी आणि घटक चाचणी अशा दोन्ही चाचण्यांमध्ये अनुकूल बसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते. औषध म्हणून वर्गीकृत केलेल्या उत्पादनासाठी आवश्यक बाब म्हणजे हे उत्पादन मूलत: उपचारात्मक किंवा रोगप्रतिबंधक वापरासाठी (औषध) आहे की केवळ काळजी घेण्यासाठी (कॉस्मेटिक)साठी आहे, हे नमूद करणे आ‌वश्यक ठरते.

हे ही वाचा:

बजरंग दल करणार सामुहिक हनुमान चालीसा पठण

काँग्रेसचे ‘गरिबी हटाओ’ वचन हीच इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक

मोचा चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा फडणवीसांना मेसेज

सर्वोच्च न्यायालयाने लागोपाठ अप्रत्यक्ष कर वर्गीकरणासंदर्भातील निर्णय देताना तेलाच्या बाजूने निकाल देऊन त्याला औषधाचा दर्जा दिला तर घामोळ्यांवर उपचार करणाऱ्या पावडरला कॉस्मेटिकचा दर्जा दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्राहक सेवा क्षेत्राकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात असल्याचे केपीएमजी-इंडियाचे हरप्रीत सिंग यांनी सांगितले. आता काही कंपन्या सुरक्षित मार्ग स्वीकारून उत्पादनावर अधिक कर लावतील. सद्य परिस्थितीत औषधी उत्पादनावर पाच टक्क्यांपासून ते १२ टक्क्यांपर्यंतचा कर लावला जातो तर, कॉस्मेटिक उत्पादनांवर १८ टक्के कर लावला जातो.

नेमकी कोणती उत्पादने कोणत्या श्रेणीत येतात, या संदर्भात मार्गदर्शक पत्र जाहीर करण्याचे निर्देश जीएसटी कौन्सिलनेही सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स विभागाला दिले पाहिजेत, अशी गरज व्यक्त होत आहे.

केरळ आणि मद्रास उच्च न्यायालयानेही ‘नायसिल’च्या उत्पादकांची घामोळ्याची पावडर कॉस्मेटिक असल्याचे नमूद केले होते. त्याविरोधात उत्पादकांनी सर्वोच् न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नायसिलमध्ये औषधी घटक असले तरी केरळ जनरल सेल्स टॅक्स ऍक्टच्या नियमानुसार, शाम्पू, टाल्कम पावडर आणि औषधी टाल्कम पावडर हे कॉस्मेटिक्सच्या श्रेणीत येत असल्याचे नमूद केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा