31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेषमणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा फडणवीसांना मेसेज

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा फडणवीसांना मेसेज

मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Google News Follow

Related

गेल्या काही दिवसांपासून मणिपूर येथे हिंसा भडकली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारामुळे मणिपूरमध्ये संचारबंदी लागू केली होती. त्यात आता थोडी शिथिलता देण्यात आली आहे. हिंसाचारामध्ये महाराष्ट्रातले २२ विद्यार्थी अडकल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून आपली अडचण सांगितली. या विद्यार्थ्यांना लवकरच विमानातून आसामला आणले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी संबंधितांना आदेश दिले आहेत.

महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. सध्याच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी तिथे राहणे योग्य नाही हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी रविवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.

दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात सांगितले आहे. राज्य सरकार हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

महाराष्ट्रातील २२ विद्यार्थी मणिपूरमध्ये आहेत. त्यांच्यापैकी विकास शर्मा आणि तुषार अवन यांच्याशी बोललो आहे. दोन्ही विद्यार्थी मणिपूरमधील औद्योगिक संस्थेत शिकत आहेत. त्यांना घरी परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे. मी त्यांना काहीही घाबरू नका असे सांगितले आहे . त्यांना सुखरूप परत आणण्याच्यादृष्टीने सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी मुख्य सचिव मनोज सौनिक आणि इतर राज्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

आयपीएलमध्ये विराट ठरला सात हजारी मनसबदार

विसरभोळेपणामध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर, कमोड, झाडूही विसरतात टॅक्सीत

तामिळनाडूतही बुलंद झाला शिवछत्रपती, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा नारा

एकलव्य खाडे, आर्यन सकपाळ यांनी ठोकली शतके

विद्यार्थ्यांचा फडणवीसांना एसएमएस

हिंसाचाराच्या वातावरणामुळे चिंताग्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला. त्यावर फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुरक्षिततेबाबात आश्वस्त केले आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. फडणवीस यांनी तत्काळ मणिपूर सरकारशी संपर्क केला. या विद्यार्थ्यांना तत्काळ परिस्थिती पूर्वपदावर येईस्तोवर सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांना येथे सुरक्षा मिळेल. शिवाय या विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्याची सुद्धा व्यवस्था महाराष्ट्र सरकारच्या वतीने तत्काळ केली जात आहे. महाराष्ट्र प्रशासन सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

हे ही वाचा:

आयपीएलमध्ये विराट ठरला सात हजारी मनसबदार

विसरभोळेपणामध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर, कमोड, झाडूही विसरतात टॅक्सीत

तामिळनाडूतही बुलंद झाला शिवछत्रपती, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा नारा

एकलव्य खाडे, आर्यन सकपाळ यांनी ठोकली शतके

संचारबंदी काही तासांसाठी शिथिल

मैती समाजाच्या अनुसूचित जमातीच्या दर्जाच्या मागणीच्या निषेधार्थ चुराचंदपूर जिल्ह्यातील तोबांग भागात बुधवारी ऑन ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर संघटनेने आयोजित केलेल्या ‘आदिवासी एकता मार्च’ मोर्च्याच्या वेळी मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाला. त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. हिंसाचाराच्या घटनांमध्ये१३,००० पेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत. मात्र, रविवारी सकाळी हिंसाचारग्रस्त भागात काही तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. जन जीवन सामान्य होत आहे. परंतु तारिले हवाई दल, ड्रोन, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून परिस्थितीवर देखरेख केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा