भुवनेश्वरला जाणाऱ्या एका बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.बसमध्ये एकूण ४८ प्रवासी होते.बस चालकाने मृत्यूपूर्वी सतर्कता दाखवून ४८ प्रवाशांचे प्राण वाचवल्याचे पोलिसांनी सांगितले.जेव्हा बस थांबली, तेव्हा प्रवासी काही विचार करतील तोपर्यंत बस चालकाचा मृत्यू झाला होता.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भुवनेश्वरला जाणाऱ्या एका बसमधील ४८ प्रवासी थोडक्यात बचावले.त्यांच्या बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला परंतु बसचालकाने विचार केला आणि बसचालकाने बस एका भिंतीवर आदळली, त्यामुळे बस थांबली.ही घटना कंधमाल जिल्यातील पाबूरीया गावाजवळ घडली.
हे ही वाचा:
चक्क ‘हमास’च्या दहशतवाद्याने मलप्पुरमच्या नागरिकांशी साधला संवाद
अपात्र झाले तरी एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार!
उद्योगपती मुकेश अंबानी यांना २४ तासांत दुसरा धमकीचा मेल
केंद्रीय मंत्रिमंडळाकडूनही ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ नावाला प्राधान्य
पोलीस अधिकारी कल्याणमयी सेंधा यांनी सांगितले की, बस चालकाचे नाव सना प्रधान असे आहे. सना प्रधान बस चालवत असताना त्याच्या छातीत कळा येऊ लागल्याने त्याचे बस वरील नियंत्रण सुटले. बसचालकाला स्वतःच्या परिस्थितीची जाणीव झाली की आपण पुढे बस चालवू शकत नाही. त्यामुळे त्याने रस्त्याकडील भिंतीवर बस आदळली, ज्याने बस थांबली आणि प्रवाशांचे प्राण वाचले.
ते पुढे म्हणाले, ‘मां लक्ष्मी’ नामक बस सहसा कंधमाल येथील सारंगढं ते उदयगिरी मार्गे भुवनेश्वरला रोज रात्री प्रवास करते. पोलिसांनी सांगितले की, घटना घडल्यानंतर बस चालकाला नजीकच्या दवाखान्यात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.पोलीस पुढे म्हणाले, बसमध्ये अतिरिक्त बस चालक होता. प्रवाशांना घेऊन मग बस पुढे निघून गेली.शवविच्छेदनानंतर बस चालक प्रधानचे शरीर त्याच्या परिवारास देण्यात आल्याचे पोलीस अधिकारी सेंधा यांनी सांगितले.तसेच या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.