28 C
Mumbai
Friday, March 6, 2026
घरविशेषऑलिंपिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाची उत्साहात सांगता!

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाची उत्साहात सांगता!

तब्बल २७ हजार स्पर्धकांनी गाजवले देशी खेळांचे मैदान

Google News Follow

Related

परंपरागत देशी खेळ केवळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारेच नाहीत तर या खेळांमुळे संस्कृती संवर्धनाचे बहुमूल्य कामही होत राहील, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले. कुर्ला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचा आज (२२ ऑगस्ट) शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम आणि समारोप करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त १३ ऑगस्टपासून क्रीडा भारतीच्या सहयोगाने या पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देऊन नव्या पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचवण्यासाठी ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. परंपरागत खेळांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात परंपरागत देशी खेळांचे आयोजन केले जाईल.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमाने तन-मनाने सुदृढ करणाऱ्या परंपरागत खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांचे मैदान अल्पावधीत उभारल्याबाबतही त्यांचे आभार मानतो. परंपरागत देशी खेळ सामान्यतः ग्रामीण भागात खेळले जातात, मात्र लोढा यांनी मुंबईसारख्या शहरात या खेळांचे आयोजन करून खऱ्या अर्थाने देशी खेळांना पुनर्जीवित केले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

परंपरागत कबड्डी, खो-खो, कुस्ती, पंजा लढवणे, तलवारबाजी, पावनखिंड दौड (मॅरेथॉन) रस्सीखेच, विटी-दांडू, मल्लखांब, फुगडी आणि मंगळागौर यासारख्या १८ देशी खेळांच्या या स्पर्धेत २७ हजार खेळाडूंनी मैदान गाजवले. तर ४५० खेळाडूंना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी लेझीमसह लाठीकाठी, तलवारबाजी या साहसी खेळांची प्रात्यक्षिकं ही सादर करण्यात आली.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्री रेखा गुप्ता प्रकरण: आरोपीला ₹२००० पाठवणाऱ्याला घेतले ताब्यात!

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमारांनी विधानसभेत गायले आरएसएसचे गीत

“ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याने मुंबईतील समीकरणं बदलणार नाहीत”

“डी.के. शिवकुमार कर्नाटकाचे मोठे कलाकार, त्यांना गांभीर्याने घेऊ नका”

यावेळी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, क्रीडा भारतीचे अध्यक्ष गणेश देवरुखकर, मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक मनोज रेड्डी उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा