मानखुर्द येथे दहीहंडीच्या तयारीदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. दहीहंडीची दोरी बांधत असताना खाली कोसळून एका गोविंदाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रोजी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथील बाल गोविंदा पथकात घडली.
हे ही वाचा:
रेड कार्पेट, आकाशात बी-२ बॉम्बर्स आणि लढाऊ विमाने…
दहा थरांचा विश्वविक्रम… कोकण नगर गोविंदाचा पराक्रम!
‘पाकिस्तानच्या अण्वस्त्र धमक्यांना भारत भीक घालत नाही’
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार दोन महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन
मिळालेल्या माहितीनुसार, जगमोहन शिवकिरण चौधरी (वय 32) नावाचा तरुण दहीहंडीसाठी दोरी बांधत असताना तोल जाऊन खाली पडला. त्याला तात्काळ गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, मुंबईतील विविध रुग्णालयात ३० गोविंदा हे जखमी झाल्याचे स्पष्ट झाले असून १५ जण जखमी आहेत. मात्र त्यातील कुणाच्याही प्रकृतीला धोका असल्याचे समोर आलेले नाही.







