जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी (२ ऑगस्ट) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) शी संबंधित आहेत आणि अलिकडच्या पहलगाम हल्ल्याशी जोडलेले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या भागात दहशतवाद्यांच्या हालचालींबद्दल गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून ही संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरू झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी श्रीनगरजवळील दाचिगम राष्ट्रीय उद्यानात लपले असल्याचा अंदाज आहे.
‘ऑपरेशन महादेव’च्या काही दिवसांनंतर ही चकमक झाली, ज्यामध्ये तीन पाकिस्तानी टीआरएफ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यापैकी पहलगाम हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार लष्कराचा टॉप कमांडर सुलेमान शाह उर्फ मुसा फौजी होता. त्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला, ज्यामध्ये १७ ग्रेनेड, एक एम४ कार्बाइन आणि दोन एके-४७ रायफलचा समावेश आहे.
गुप्तचर माहितीनुसार, या प्रदेशात पाच टीआरएफ दहशतवादी सक्रिय होते. ‘ऑपरेशन महादेव’मध्ये तिघांना निष्क्रिय करण्यात आले आणि आज ‘ऑपरेशन अखल’मध्ये एकाला ठार करण्यात आले, त्यामुळे एक दहशतवादी अजूनही फरार असल्याचे मानले जात आहे.
हे ही वाचा:
शिखर सावरकर पुरस्कार २०२५ साठी १४ ऑगस्टपर्यंत अर्ज करा!
दहशतवाद्यांना सोडा, निरपराधांना धरा !







