स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने, प्रतिष्ठेच्या ‘शिखर सावरकर पुरस्कार, २०२५’ साठी इच्छुक व्यक्ती आणि संघटनांना १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत आवेदन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘शिखर सावरकर पुरस्कारांचे हे पाचवे वर्ष आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी एकूण तीन पुरस्कार दिले जाणार
* ‘शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार’ (वैयक्तिक):
सह्याद्री पर्वतरांगामध्ये विशेष उल्लेखनीय साहसी गिर्यारोहण करणाऱ्या युवा गिर्यारोहकासाठी.
* ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार’ (सांघिक/संस्थात्मक):
सह्याद्रीतील दुर्गम किल्ल्यांचे संवर्धन तसेच साहसांबरोबरच इतर पूरक कार्य करणाऱ्या संस्थांसाठी.
* ‘शिखर सावरकर जीवनगौरव पुरस्कार’: गिर्यारोहण क्षेत्रात, विशेषतः हिमालयातील पर्वतरांगामध्ये राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ भारतीय दिग्गजासाठी. (यासाठी आवेदन मागवले जात नाही; निवड समिती निर्णय घेते)
हे ही वाचा:
‘ओव्हल’ कसोटीत सिराज, कृष्णाची भेदक गोलंदाजी
ते दोन अज्ञात मृतदेह बोलतील काय ?
मिलिंद घाग मनसेच्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख संघटक
आवेदन प्रक्रिया: ‘शिखर सावरकर जीवनगौरव’ वगळता, उर्वरित दोन पुरस्कारांसाठी विहित मुदतीत प्राप्त झालेल्या योग्य आवेदनांमधून संभाव्य पुरस्कारार्थींची निवड केली जाईल. पुरस्कार विजेत्यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि आकर्षक धनराशी देऊन सन्मानित करण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.
साहस आणि राष्ट्रभक्तीचा हा सन्मान मिळवण्यासाठी इच्छुक साहसी व्यक्ती आणि संस्थांनी खालील वेबलिंकवर ऑनलाइन आवेदन विनाविलंब आणि विहित मुदतीत सादर करावे.
वेबलिंक:
‘शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार’ (वैयक्तिक):
https://forms.gle/WAyzsmM6MbmbN1JN9
‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार’ (सांघिक/संस्थात्मक):
https://forms.gle/46PgMkpnh3FuEsw36







