33 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेषस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल

शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

Google News Follow

Related

अडीच वर्षात महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम, लोकाभिमुख योजनांमुळे भरघोस बहुमताने राज्यात महायुतीचे सरकार आले. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी महापालिका, नगर परिषदा, जिल्हापरिषदा, नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

बीड, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, नाशिक आणि जालना या पाच जिल्ह्यातील विविध पक्षांचे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज (१५ जुलै) मुंबईत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

आज बीड जिल्ह्यातील उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष अनंत चिंचाळकर, वशिष्ठ सातपुते, रामदास ढगे, संदीप माने, शिवाजी सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शाखाप्रमुखांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतला. तसेच छत्रपती संभाजी नगरमधील डॉ. जे. के जाधव, बाबा उगले, डॉ. परमेश्वर गुट्टे, मंगेश जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पंढरपूरमधील राम भिंगारे, श्रीनिवास उपळकर, औदुंबर गंगेकर, प्रशांत कोकरे तसेच नाशिक जिल्ह्यातील येवला येथील रामकृष्ण खोकले, सुनिता जाधव, गणेश कदम, कल्पना ठोंबरे या सरपंचांसह पाच उपसरपंचांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. जालना जिल्ह्यातील सरपंच योगिता मुळे आणि उपसरपंच शेख मुकर्रम शेख नुर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

हे ही वाचा : 

‘हीर एक्सप्रेस’चा ट्रेलर प्रदर्शित

ग्लोबल पीसी शिपमेंट ६३ दशलक्ष युनिटवर

‘सिला’ चित्रपटाचे प्रमोशन!

‘पीपल्स जनरल’ म्हणून ओळखले जाणारे व्ही. के. कृष्ण राव

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून शिवसेनेत विविध पक्षातील लोकांचा प्रवेशाचा ओघ सुरु आहे. राज्यातील लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडके शेतकरी यांच्यासह सर्वच घटकांना मागील अडीच वर्षांत न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे शिवसेनेकडे लोकांचा ओघ वाढला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, यात महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा