ऑपरेशन धराली : वेगवान बचावकार्य, शेकडोंची सुटका

ऑपरेशन धराली : वेगवान बचावकार्य, शेकडोंची सुटका

उत्तराखंडमधील धराली आपत्तीग्रस्त भागात सलग पाचव्या दिवशी म्हणजेच शनिवारीही मदत व बचावकार्य सुरूच आहे. आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

उत्तरकाशी पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (X) हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ५२ नागरिकांना आयटीबीपी मातली कॅम्पमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पोलिसांनी म्हटले आहे, “हर्षिल येथील धराली आपत्ती स्थळी पोलिस, एसडीआरएफ, एनडीआरएफ, आयटीबीपी, लष्कर, अग्निशमन दल, महसूल विभाग अशा अनेक यंत्रणांच्या पथकांकडून बचावकार्य सुरू आहे. आपत्तीग्रस्त भागातील अडकलेल्या नागरिकांना एअरलीफ्ट करण्याचे काम सातत्याने सुरू आहे.”

हेलिकॉप्टरद्वारे सतत मदत
चिनूक आणि चीता हेलिकॉप्टरद्वारे अडकलेल्या यात्रेकरूंना धराली व हर्षिलच्या उंच भागात पोहोचवले जात आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात असून तेथील बाधित लोकांची तपासणी व उपचार केले जात आहेत. लष्कर, आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, राज्य सरकार व स्थानिक प्रशासन अशी ८०० पेक्षा जास्त सदस्यांची पथके या बचाव मोहिमेत सहभागी आहेत. धराली, हर्षिल आणि मातली येथे तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

मोठ्या प्रमाणावर एअर रेस्क्यू ऑपरेशन
बादलफुटीमुळे बाधित भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी २ चिनूक हेलिकॉप्टर, २ एमआय-१७ वायुसेनेची हेलिकॉप्टर्स आणि अन्य ४ लष्करी हेलिकॉप्टर्स कार्यरत आहेत.

भूस्खलन बाधित भागातून आतापर्यंत —

अद्यापही अनेक बेपत्ता
धराली येथे ५ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण बादलफुटीमुळे अचानक पूर आणि भूस्खलन झाले. यात सुमारे ५० नागरिक, ८ जवान आणि १ ज्युनियर कमिशंड ऑफिसर (जेसीओ) अद्यापही बेपत्ता आहेत. या आपत्तीनंतर बरतवारी, लिंचीगड, गंगराणी, हर्षिल आणि धराली या भागातील महत्त्वाचे रस्ते पूर्णपणे खचले असून संपर्क तुटलेला आहे.

लष्कर आणि भारत-तिबेट सीमा पोलिस दल (ITBP) अडकलेल्या पर्यटकांना अन्न, वैद्यकीय मदत आणि निवारा पुरवत आहेत. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून विस्थापित लोकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जात आहे.

Exit mobile version