मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याप्रकरणी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आलेल्या आमदार संजय गायकवाड यांचा मुद्दा विधानपरिषदेतही गाजला. उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्याची विनंती केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घटना गंभीर असल्याचे नमूद केले आणि यासंदर्भात दखल घेवून योग्य कारवाई करण्याचे काम विधानपरिषद अध्यक्षांकडे सोपवले.
अनिल परब विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित करत म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक प्रतिमा आहे, सुसंस्कृत म्हणून लोक त्यांच्याकडे बघतात. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये एक आमदार बनीयन आणि टॉवेलवर येवून बॉक्सिंग स्टाइलने कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करतोय. याचे व्हीडीओ काढून सोशल मिडियावर शेअर केला जातोय. माझी विनंती आहे की, अशा लोकांचा बंदोबस्त करणार का?, त्यांना निलंबित-बडतर्फ करणार का? पण आपण हे खपवून घेणार नाहीत हे राज्याचे जनतेला कळूदेत, असे परब म्हणाले.
हे ही वाचा :
हिंदू असल्याचे भासवून तो मैत्रिणीला हनुमान चालिसा म्हणून दाखवायचा, पण…
राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले!
राजस्थानमधील कन्हैय्यालाल हत्याप्रकरणावरील ‘उदयपूर फाइल्स’ला स्थगितीस नकार
मॉलमध्ये काम करायचे असेल तर मुस्लिम हो, म्हणणाऱ्या फराझला अटक
अनिल परब यांच्या प्रश्नाला उत्तर देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या घटनेची माहिती घेतली-व्हीडीओ देखील पाहिला. मात्र, अशा प्रकारचे वर्तन शोभनीय नाही. यामुळे विधिमंडळाची-आमदारांची प्रतिष्ठा, प्रतिमा कमी होते. आमदार निवासमधील सोयी नीट नव्हत्या, भाजीला वास येत होता, अशा प्रकारची माहिती तेथून समोर आली. पण, याबाबत तक्रार केली जाऊ शकते, नंतर कारवाई केली जाते. लोक प्रतिनिधिनी मारहाण करणे चुकीचे आहे.
ते पुढे म्हणाले, टॉवेलवर मारलं किंवा कशावर मारलं तरी ते चुकीचचं आहे, योग्य नाही. यातून सर्व आमदारांबद्दल सत्तेचा गैरवापर करणे, अशा प्रकारच्या चुकीच्या भावना लोकांमध्ये जातात. ही अतिशय गंभीर बाब आहे. या संदर्भात दखल घेवून अध्यक्षांनी योग्य ती कारवाई करावी.







