29 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरविशेषदिवाळी होणार गोड! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज

दिवाळी होणार गोड! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

राज्यात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक भागांत शेती, घरांसह शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.

दिवाळीपूर्वीच बळीराजाच्या खात्यावर मदतनिधी जमा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आता दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अखेर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी मदत पॅकेजची घोषणा केली आहे. त्यानुसार, ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली, त्यांना हेक्टरी ३.४७ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच, अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांच्या घरांचे, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी जमीनही खरडून गेली. त्यामुळे आता रब्बीचे पिकेही घेता येणार नाहीत. मात्र, शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी निर्णय घेतला आहे. राज्यात १ कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टर जमिनीवर लागवड झाली होती. त्यापैकी ६८ लाख ७९ हजार ७५६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झालं आहे. सरकार ज्या ठिकाणी मदत करत आहे, त्यामध्ये २९ जिल्हे, २५३ तालुके आणि २०५९ मंडळांचा समावेश आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हे ही वाचा : 

अमेरिकेच्या तिजोरीला लागलेल्या टाळ्याचा फटका हवाई वाहतुकीला

गुजरातमधील द्वारका शहरात पॅलेस्टाइनचा झेंडा फडकावणाऱ्याला अटक

बलुचमध्ये जाफर एक्सप्रेसवर पुन्हा हल्ला; आयईडी स्फोटानंतर सहा डबे घसरले

केस कापणाऱ्या जावेद हबीबने अनेकांचे खिसे कापले, २० गुन्हे दाखल

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्व प्रकारची मदत केली जाणार असून खरडून गेलेली जमीन, शेती पिकांचे नुकसान, मृत जनावरे यासंदर्भातील मदत करण्यात येणार आहे. ज्या घरांचे संपूर्ण नुकसान झालेलं आहे, ती घरे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून बांधली जातील. डोंगरी भागातील ज्या घरांचं नुकसान झालं आहे, त्या घरांना प्रत्येकी १० हजारांची जास्त मदत दिली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या गोठ्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्यांनाही मदत दिली जाईल. दुकानदारांनाही नुकसानभरपाई दिली जाईल.

शेतकऱ्यांना कशी मिळणार मदत?

  • राज्य सरकारच्या वतीने नुकसान भरपाईसाठी एकूण ३१,६२८ कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.
  • साधारण २९ जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान, २५३ तालुक्यांमध्ये सरसकट मदत होणार.
  • एकूण १ कोटी ४३ लाख ५२ हजार २८१ हेक्टर जमिनीवर लागवड त्यापैकी ६८ लाख ६९ हजार ७५६ हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झाल्याची नोंद. खरडून गेलेल्या जमिनींसाठी ४७,००० रुपये हेक्टरी रोख आणि ३ लाख रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून दिले जातील. बाधित विहिरींसाठी विशेष बाब म्हणून ३० हजार रुपये प्रतिविहीर दिले जातील.
  • पीकनुकसान भरपाईसाठी ६५ लाख हेक्टर जमिनीसाठी ६१७५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रबीच्या पिकासाठी प्रतिहेक्टरी अतिरिक्त १०,००० रुपये दिले जातील. कोरडवाहूसाठी हेक्टरी १८,५०० हंगामी बागायतीला २७,००० तर बागायती शेतकऱ्याला ३२,५०० रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • १०० टक्के घरांचे नुकसान झाले असल्यास प्रधानमंत्री आवास योजनेत पूर्णपणे नवीन घर दिले जाणार. अंशतः पडझड झालेल्या घरांनाही मदत मिळणार. दुकानांचे नुकसान झाले असल्यास ५० हजारांपर्यंतची मदत केली जाईल. पायाभूत सुविधांच्या नुकसानीची भरपाई म्हणून १०,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • दुधाळ जनावरांसाठी ३७,५०० रुपयांपर्यंत प्रति जनावर मदत केला जाणार. तर, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३२,००० रुपये प्रति जनावर दिले जातील. कोंबड्यांसाठी १०० रुपये प्रतिकोंबडी मदत दिली जाईल.
  • दुष्काळावेळच्या सर्व उपाययोजना ओला दुष्काळ समजून केल्या जातील. जमीन महसुलात सूट, कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाची वसुली, शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी अशा सर्व गोष्टी लागू करण्यात आल्या आहेत.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा