जम्मू-काश्मीरमध्ये तीन पाकिस्तानी जवानांना टिपले, ७ घुसखोर ठार!

सुरक्षा दल अलर्ट मोडवर 

जम्मू-काश्मीरमध्ये तीन पाकिस्तानी जवानांना टिपले, ७ घुसखोर ठार!

जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने ठार केले आहे. ही घटना पूंछ जिल्ह्यातील कृष्णा व्हॅली सेक्टरमध्ये घडली. ४-५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवर सात घुसखोरांना ठार केले. यामध्ये दोन ते तीन पाकिस्तानी लष्करी जवानांचा समावेश आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हे घुसखोर पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) सोबत भारतीय सुरक्षा दलांवर हल्ला करू इच्छित होते. याच दरम्यान सुरक्षा दलाने कारवाई करत सात जणांना ठार केले. पाकिस्तानी बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने यापूर्वीही भारतीय सैन्यावर छुप्या पद्धतीने हल्ला केला आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी काश्मीरसह सर्व प्रश्न भारतासोबत चर्चेद्वारे सोडवायचे असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे, जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि लष्कर-ए-तैयबा (एलईटी) सारख्या दहशतवादी संघटनांच्या कमांडरनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये एक परिषद आयोजित केली होती. यावरून पाकिस्तानचा ढोंगीपणा दिसून येतो.

हे ही वाचा : 

१५ कोटी रुपये ऑफर केल्याच्या दाव्यानंतर एसीबीचे पथक केजरीवालांच्या निवासस्थानी

महाराष्ट्रातील वाढलेले ३९ लाख मतदार आता बिहारमध्ये जातील!

अमेरिकेत ४ लाख कमावण्यापायी ५० लाख गमावले!

चेंबूर माहुल गाव येथून ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक!

वृत्तानुसार, मारल्या गेलेल्या घुसखोरांमध्ये अल-बद्र या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी होते. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी लाहोरमध्ये एका रॅलीत, दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याने भारताविरुद्ध भडकाऊ विधान केले. सभेला संबोधित करताना तल्हा याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेत त्यांना इशारा दिला. “मी पंतप्रधान मोदींना इशारा देतो की काश्मीर मुस्लिमांचा आहे आणि आम्ही तुमच्याकडून काश्मीर हिसकावून घेऊ. लवकरच पाकिस्तानचा भाग होईल,” असे तल्हा म्हणाला होता.

Exit mobile version