भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ मधील १४ सप्टेंबरला दुबई येथे झालेला सामना सध्या चर्चेत आहे. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले होते. यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंसह माजी खेळाडूंनी हा अपमान असल्याचे म्हणत टीका करण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानचे माजी कर्णधार मोहम्मद युसुफ यांनी थेट टीव्हीवर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याविषयी अश्लील भाषा वापरल्याचे समोर आले आहे.
भारतीय संघाने सामन्यानंतर पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन न केल्याची बाब पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. यावरून चर्चा सुरू असून समा टीव्हीवर आयोजित अशाच एका चर्चासत्रात माजी कर्णधार मोहम्मद युसुफ यांनी सूर्यकुमार यादव यांच्याबाबत अश्लील भाषेचा वापर केला. सूत्रसंचालिकेला वाटले की युसुफ कदाचित नाव घेण्यात चूक करत आहेत, त्यामुळे त्यांनी स्वतः सूर्यकुमार यादव यांचे नाव घेतले. मात्र, तरीही युसुफ थांबले नाहीत आणि सतत अपमानास्पद भाषा वापरत राहिले.
पाकिस्तानचे माजी कर्णधार रशीद लतीफ आणि शाहिद आफ्रिदी यांनीदेखील भारतीय संघ आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. आफ्रिदी यांनी भारतीय संघाच्या खेळभावनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर रशीद लतीफ म्हणाले, “जर हा पहलगामचा मुद्दा असेल तर युद्ध करा, पण क्रिकेटला मध्ये आणू नका. याआधीही युद्ध झाले आहेत, पण आम्ही नेहमीच हस्तांदोलन केले आहे.”
हे ही वाचा :
भारतीय क्रिकेट संघासाठी अपोलो टायर्स नवा प्रायोजक!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त प्रदेश भाजपातर्फे ‘सेवा पंधरवडा’
भारत ड्रग्ज तस्करीत सहभागी १६,००० परदेशी नागरिकांना हद्दपार करणार!
विश्वबंधुत्व दिनानिमित्त आयोजित कृती कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद
भारत–पाकिस्तान सामन्यात टॉसच्या वेळी सूर्यकुमार यादव यांनी पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा यांच्याशी हस्तांदोलन केले नव्हते. सामन्यात विजय मिळवल्यानंतरही भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले. सादरीकरणावेळी सूर्यकुमार यादव यांनी पहलगाव हल्ल्याचा उल्लेख केला आणि पीडितांप्रती एकात्मता व्यक्त करत विजय भारतीय सैनिकांना समर्पित केला. सूर्यकुमार याच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.







