६० वर्षांची पाकिस्तानी महिलेचे बंगालमध्ये होते ४५ वर्षे वास्तव्य, केली अटक!

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्देशानुसार कारवाई

६० वर्षांची पाकिस्तानी महिलेचे बंगालमध्ये होते ४५ वर्षे वास्तव्य, केली अटक!

पश्चिम बंगालमध्ये ४५ वर्षांपासून राहत असलेल्या ६० वर्षीय पाकिस्तानी महिलेला शनिवारी (४ मे) हुगळी जिल्ह्यातून राज्य पोलिसांनी अटक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. फातेमा बीबी असे या महिलेचे नाव आहे. ती १९८० मध्ये पर्यटक व्हिसावर भारतात आली होती आणि तेव्हापासून ती तिच्या पती आणि दोन मुलींसह चंदननगरमध्ये स्थायिक झाली होती.

पोलिस सूत्रांनुसार, फतेमा बीबी १९८० मध्ये तिच्या वडिलांसोबत पाकिस्तानातील रावळपिंडीहून आली होती. १९८२ मध्ये तिने चंदननगर येथील बेकरी मालक मुझफ्फर मलिकशी लग्न केले आणि तेव्हापासून ती तिथेच राहते. तथापि, पोलिसांच्या नोंदीनुसार, तिच्या आगमनाच्या फक्त एक वर्षानंतर ती “बेपत्ता” असल्याचे दिसून आले आणि तिच्या इमिग्रेशन स्थितीबद्दल कोणतेही अपडेट मिळाले नाहीत.

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात जारी करण्यात आलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आली. राज्यांमधील पाकिस्तानी नागरिकांचा मागोवा घेण्याच्या सरकारच्या सूचनांनंतर, बंगाल पोलिसांनी राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या नोंदी पडताळण्यास सुरुवात केली. या पडताळणी मोहिमेदरम्यान, अधिकाऱ्यांना असे आढळून आले की फातेमा बीबी चार दशकांहून अधिक काळ सरकारी नोंदींमध्ये बेपत्ता होती.

हे ही वाचा : 

बलुचिस्तान टाईम्स आणि बलुचिस्तान पोस्ट या न्यूज पोर्टलचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक!

अभिनेता एजाज खानवर चारकोपमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल!

हरयाणात काँग्रेसचे माजी आमदार धर्मसिंग छोक्कर अटकेत!

दहशतवाद्यांशी संबंधावरून ताब्यात घेतलेला तरुण गेला वाहून

पोलिसांनी अखेर शोध घेत तिला अटक केली. स्थानिकांनी अटकेवर धक्का व्यक्त केला आणि म्हणाले की, ती पाकिस्तानची असल्याचे माहिती नव्हते. “तिचे पाकिस्तानात आता कोणी नाही. तिचे आयुष्य आता इथेच आहे,” असे एका शेजाऱ्याने सांगितले. फातेमाला आरोग्याच्या समस्या आहेत आणि तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले.

तिचा पती मुझफ्फर मल्लिक यांनी दावा केला की, फतेमा ही चंदननगर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड १२ ची नोंदणीकृत मतदार आहे आणि तिच्याकडे आधार आणि पॅन कार्डसारखी कागदपत्रे आहेत. त्यांनी असेही सांगितले की तिने भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता, परंतु प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. या प्रकरणी पोलिसांची पुढील कारवाई सुरु आहे.

Exit mobile version