30 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरविशेषबलुचिस्तान टाईम्स आणि बलुचिस्तान पोस्ट या न्यूज पोर्टलचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक!

बलुचिस्तान टाईम्स आणि बलुचिस्तान पोस्ट या न्यूज पोर्टलचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक!

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कारवाई सुरूच 

Google News Follow

भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, भारत सरकारने दोन न्यूज पोर्टलच्या एक्स-हँडलवर बंदी घालून आणखी एक मोठा धक्का दिला आहे. भारत सरकारने ‘बलुचिस्तान टाईम्स’ आणि ‘बलुचिस्तान पोस्ट’ या न्यूज पोर्टलचे एक्स अकाउंट ब्लॉक केले आहेत. ही बंदी भारतात लागू करण्यात आली आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेत आहे. या संदर्भात, भारताने पाकिस्तानवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. भारताच्या कारवाईने निराश झालेला पाकिस्तान सतत भारताला धमक्या देत आहेत. विशेष म्हणजे, एकीकडे पाकिस्तान भारताला धमक्या देत आहे तर दुसरीकडे भारताच्या कारवाईमुळे घाबरला देखील आहे. भारत कधीही हल्ला करू शकतो अशी भीती पाक सरकारला आहे.

यापूर्वी भारताने पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी आणि माजी पाकिस्तान पंतप्रधान आणि पीटीआय संस्थापक इम्रान खान यांच्यावर ही कारवाई केली होती. या दोन्ही नेत्यांचे एक्स अकाउंट भारताने ब्लॉक केले होते.

याआधीही भारताने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे एक्स अकाउंट भारतात बंदी घातली होती. ख्वाजा आसिफ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सतत भारताविरुद्ध विष ओकत होता. त्याने भारतावर अणुहल्ला करण्याची धमकीही दिली होती.

हे ही वाचा : 

हरयाणात काँग्रेसचे माजी आमदार धर्मसिंग छोक्कर अटकेत!

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त!

दहशतवाद्यांशी संबंधावरून ताब्यात घेतलेला तरुण गेला वाहून

सोडणार नाही ! तेल अवीवजवळील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर नेतान्याहूंचा हौथींना दम

यापूर्वी, भारताने डॉन न्यूज, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, द पाकिस्तान रेफरन्स, जिओ न्यूज, समा स्पोर्ट्स, इर्शाद भट्टी, जीएनएन, उजैर क्रिकेट, अमर चीमा एक्सक्लुझिव्ह, अस्मा शिराजी, मुनीब फारूख, सुनो न्यूज एचडी आणि रझी नामा यासारख्या काही प्रमुख पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली होती. भारताकडून अजूनही अशी कारवाई सुरूच आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा