29.2 C
Mumbai
Saturday, May 17, 2025
घरविशेषजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त!

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त!

टिफिन बॉक्समध्ये आयईडी सापडले

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला आहे. जिल्ह्यातील सुरणकोट सेक्टरमधील हरी मारोटे गावात सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा हा अड्डा सापडला. रविवारी (४ मे) रात्री उशिरा लष्कर, पोलिस आणि एसओजीसह सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांचे हे अड्डे सापडले, जिथून पाच आयईडी, वायरलेस सेट आणि काही कपडे जप्त करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय रायफल्स (आरआर), भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडो युनिट्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्तपणे केलेल्या शोध मोहिमेदरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यांचा एक अत्याधुनिक ‘फॉक्स होल’ सापडला. या ‘फॉक्स होल’ची रचना आणि त्यात लपलेल्या संसाधनांनी सुरक्षा संस्थांनाही धक्का दिला होता. सुमारे सहा फूट खोल आणि आठ फूट रुंद असलेल्या या भूमिगत खड्ड्यात दहशतवाद्यांनी दीर्घकाळ लपण्याची व्यवस्था केली होती. येथे दहशतवाद्यांनी गॅस सिलेंडर, सौर दिवे, शस्त्रे आणि इतर आवश्यक वस्तू लपवून ठेवल्या होत्या.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी संपूर्ण खोऱ्यात मोठ्या प्रमाणात दहशतवादविरोधी मोहिमा सुरू केल्या आहेत, संशयित लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत, शोध मोधीमेदरम्यान दहशतवाद्यांनी वापरलेले आश्रयस्थान उद्ध्वस्त केले आहेत आणि शेकडो दहशतवाद्यांशी संबंधितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

यापूर्वी, बांदीपोरा पोलिसांनी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित ओव्हर ग्राउंड वर्कर्सच्या (ओजीडब्ल्यू) एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता आणि चार संशयितांना अटक केली होती. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की लष्कर-ए-तोयबाचे काही ओजीडब्ल्यू त्यांच्या पाकिस्तानी हँडलर्सच्या सूचनेनुसार पोलिस, सुरक्षा दल आणि बाहेरील नागरिकांना लक्ष्य करण्याचा कट रचत आहेत.

हे ही वाचा : 

दहशतवाद्यांशी संबंधावरून ताब्यात घेतलेला तरुण गेला वाहून

सोडणार नाही ! तेल अवीवजवळील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर नेतान्याहूंचा हौथींना दम

योगी सरकारची नेपाळ सीमेवर कारवाई, ८० हून अधिक मदरसे सील!

पाकिस्तान भारताशी लढू शकेल, पण फक्त चार दिवस

या माहितीच्या आधारे, बांदीपोरा पोलिसांनी परिसरात विशेष चौक्या उभारल्या आणि शोध मोहीम सुरू केली. त्याच क्रमाने, पोलीस, ‘डी-कोय’ ४५ बटालियन सीआरपीएफ आणि १३ आरआरच्या ‘ई-कोय’ यांनी संयुक्तपणे कानिपोरा नैदखाई सुंबल परिसरात एक चेक पोस्ट उभारले.

तपासणी दरम्यान, मोहम्मद रफिक खांडे आणि मुख्तार अहमद दार या दोन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्या झडतीदरम्यान, त्यांच्याकडून दोन चिनी हँडग्रेनेड, एक ७.६२ मिमी मॅगझिन आणि ७.६२ मिमी जिवंत काडतुसांचे ३० राउंड जप्त करण्यात आले. या संदर्भात, सुंबल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
248,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा