अभिनेता एजाज खानच्या अडचणी वाढत आहेत. यापूर्वी ‘हाऊस अरेस्ट’ या शोमुळे एजाज खानविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. या शोमधून अश्लीलता पसरवल्याचा अभिनेत्यावर आरोप आहे. या शोवरून अद्याप वाद संपलेला नसताना आता एजाज खानविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. एजाज खानविरुद्ध मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी एजाजविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, एजाज खानने तिला त्याच्या ‘हाऊस अरेस्ट’ शोमध्ये होस्टची भूमिका देण्यासाठी फोन केला होता. शूटिंग सुरू असताना, एजाज खानने प्रथम पीडितेला प्रपोज केले आणि धर्म बदलून तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. यानंतर अभिनेत्याने तिच्या इच्छेविरुद्ध जाऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित अभिनेत्रीने काल (४ मे ) संध्याकाळी चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे चारकोप पोलिसांनी एजाजविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
अभिनेता एजाज खानविरुद्ध बलात्काराशी संबंधित भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध चारकोप पोलिस ठाण्यात बीएनएसच्या कलम ६४, ६४(२एम), ६९, ७४ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
हे ही वाचा :
हरयाणात काँग्रेसचे माजी आमदार धर्मसिंग छोक्कर अटकेत!
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त!
दहशतवाद्यांशी संबंधावरून ताब्यात घेतलेला तरुण गेला वाहून
सोडणार नाही ! तेल अवीवजवळील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर नेतान्याहूंचा हौथींना दम
दरम्यान, अभिनेता एजाज खान सध्या त्याच्या ‘हाऊस अरेस्ट’ शोमुळे चर्चेत आहे. उल्लू ॲपच्या शो ‘हाऊस अरेस्ट’ला अश्लील म्हणत अनेक राजकीय संघटनांनी त्याविरुद्ध आवाज उठवला आणि सरकारकडून कारवाईची मागणी केली. या संदर्भात एजाज खान आणि उल्लू ॲपच्या सीईओंविरुद्धही एफआयआर दाखल करण्यात आला. या एफआयआरनंतर, उल्लू ॲपवरून हाऊस अरेस्टचे सर्व भाग काढून टाकण्यात आले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने एजाज खान आणि उल्लू ॲपच्या सीईओ विभू अग्रवाल यांना समन्स पाठवले असून ९ मे रोजी आयोगासमोर हजर राहण्यास सांगितले आहे.