फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) आणि गुप्तचर संस्थांनी शोध घेत छापा टाकलेल्या इस्लामाबादच्या सेक्टर एफ-११ मधील एका बनावट ‘कॉल सेंटर’वर स्थानिकांनी एकच गोंधळ घातला आणि कॉल सेंटर मधील साहित्य घेवून पळ काढला. या लुटीचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या फुटेजमध्ये तरुणांचा जमाव परिसरात घुसून तांत्रिक उपकरणे घेवून जाताना दिसत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे अधिकाऱ्यांच्या कारवाईच्या हाताळणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
द नेशनच्या वृत्तानुसार , १५ मार्च २०२५ रोजी, एफआयएने इस्लामाबादमधील एका बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला होता. या कॉल सेंटरवर आंतरराष्ट्रीय फसवणुकीत सहभागी असल्याचा आरोप होता. काही काळापासून त्याची चौकशी सुरू होती, एफआयएच्या सायबर क्राइम सेलने हा छापा टाकला होता. छाप्यादरम्यान, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी एका परदेशी नागरिकांसह २४ जणांना ताब्यात घेतले. तथापि, छाप्यादरम्यान काही संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले.
अहवालानुसार, एफआयएच्या सूत्रांनी उघड केले आहे की अधिकाऱ्यांना काही काळापासून कॉल सेंटरमधील बेकायदेशीर कारवायांबद्दल माहिती मिळत होती परंतु कारवाई करण्यासाठी ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीची वाट पाहत होते. या कॉल सेंटरचा वापर वेगवेगळ्या देशांमधील लोकांची फसवणूक करण्यासाठी केला जात होता.
पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, संशयितांना अटक करण्यात एजन्सीला यश आले असले तरी, छापेमारीचे रूपांतर लवकरच गोंधळात झाले. या गोंधळामुळे स्थानिकांनी कॉल सेंटरमध्ये घुसून लॅपटॉप आणि इतर उपकरणे लुटली, जी पुराव्यासाठी उपयुक्त होती.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, लोकांचा जमाव बनावट कॉल सेंटरच्या आवारात घुसून लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू लुटताना दिसत आहे. जे काही भेटेल ते लुटून पळताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये, लोक लॅपटॉप, मॉनिटर्स, संगणक प्रणाली आणि स्पीकरसह कॉल सेंटरमधून बाहेर पडताना दिसत आहेत. काही परदेशी लोकही घटनास्थळावरून पळून जाताना दिसले.
हे ही वाचा :
गोरेगावात मोलकरणीवर लैंगिक अत्याचार करून मालक फरार
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खर्च केले ८६९ कोटी; हाती आले फक्त ५२ कोटी!
प्रभू राम जन्मभूमी ट्रस्टने गेल्या पाच वर्षात ४०० कोटींचा कर भरला!
रामजन्मभूमी आंदोलनाला ८ वर्षे लागली, औरंग्याच्या कबरीसाठी पाहू किती वर्षे लागतात?
दरम्यान, अटक केलेल्या व्यक्तींना पुढील चौकशीसाठी एफआयए कार्यालयात हलवण्यात आले आहे. यामध्ये परदेशी नागरिकांचा सहभाग असल्याची पुष्टी एफआयए अधिकाऱ्यांनी केली आहे. परंतु अतिरिक्त तपशील देण्यास नकार दिला आहे.
Pakistanis have looted the Chinese Call centres in Islamabad….laptops, TV & other items all looted 😂
Note: This happened in holy month of Ramzan. pic.twitter.com/dlb2vKOKPh
— Incognito (@Incognito_qfs) March 17, 2025







