33 C
Mumbai
Tuesday, March 24, 2026
घरविशेषविभाजनाच्या दिवशी पाकिस्तानने दहशतवाद्यांसाठी ढाळले अश्रू!

विभाजनाच्या दिवशी पाकिस्तानने दहशतवाद्यांसाठी ढाळले अश्रू!

पाकिस्तानचे दहशतवादी संबंध पुन्हा उघड

Google News Follow

Related

पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबध पुन्हा एकदा उघड झाले आहेत. पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि वरिष्ठ नागरी अधिकारी भारताच्या अलिकडच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवाद्याच्या कबरीवर उघडपणे आदरांजली वाहताना दिसले.

१४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी, लाहोर विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) मेजर जनरल राव इम्रान सरताज, संघीय मंत्री मलिक रशीद अहमद खान, जिल्हा पोलिस अधिकारी कसूर मुहम्मद इसा खान आणि उपायुक्त इम्रान अली यांनी लाहोरमधील मुरीदके येथील मुदसिर अहमद याच्या कबरीला भेट दिली.

मुदसिर, एक उच्च दर्जाचा लष्कर-ए-तोयबा कार्यकर्ता होता, जो १९९९ च्या आयसी-८१४ अपहरण आणि २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी संबंधित होता. भारतीय सैन्याने ‘मरकझ तैयबा’, जे लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आहे, त्यावर हल्ला केला तेव्हा मुदसिर मारला गेला. 

मुदसिर अहमद व्यतिरिक्त, भारतीय हल्ल्यात युसूफ अझहर आणि अब्दुल मलिक रौफ यांच्यासह इतर दीर्घकाळापासून हवे असलेले लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादीही मारले गेले. हे दोघेही भारताविरुद्ध मोठ्या दहशतवादी कटांचे प्रमुख नियोजनकार होते.

हे ही वाचा : 

ट्रम्प-पुतिन बैठक युक्रेन युद्धबंदीशिवाय संपली!

लिओनेल मेसीचा भारत दौरा जाहीर; डिसेंबरमध्ये ‘जीओएटी टूर’ची धूम

अरुणाचल प्रदेशात 14 हजार फुटांवर ‘तिरंगा मार्च’

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सायबर हल्ला

दहशतवाद्याकडून अंत्यसंस्कार 

दहशतवादी मुदसिरचा अंत्यसंस्कार ७ मे रोजी मुरिदके येथे झाला. त्याचे नेतृत्व लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अब्दुल रौफ ( ज्याला अब्दुर रौफ म्हणूनही ओळखले जाते ) याने केले. हा अमेरिकेच्या ट्रेझरी निर्बंधांखाली विशेष जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आला आहे. यावेळी पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि पंजाबचे पोलीस महानिरीक्षक लष्कर-ए-तोयबा कार्यकर्त्यांसोबत अंत्यसंस्कार करताना दिसले.

पाकिस्तानचे दावे विरुद्ध वास्तविकता

अंत्यसंस्कार आणि त्यानंतरच्या कबरीच्या दर्शनातील दृश्ये दहशतवादविरोधी मुद्द्यावर पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघड करतात. एकीकडे सार्वजनिकरित्या दहशतवादाविरुद्ध लढण्याचा दावा करायचा आणि दुसरीकडे दहशतवाद्यांचा सन्मान करायचा, हे समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओ मधून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने गार्ड ऑफ ऑनर दिला होता. यामधून पाकिस्तानचे दहशतवाद्यांना असलेले संरक्षण दिसून येते.  

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा