30 C
Mumbai
Wednesday, July 17, 2024
घरविशेष१७ वर्षीय पलकने सुवर्ण तर ईशा सिंगने रौप्यपदकावर कोरले नाव !

१७ वर्षीय पलकने सुवर्ण तर ईशा सिंगने रौप्यपदकावर कोरले नाव !

आशियाई स्पर्धेत भारताच्या नेमबाजांची दमदार कामगिरी

Google News Follow

Related

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहाव्या दिवसाची सुरुवात अत्यंत शानदार पद्धतीने झाली.विशेषतः भारतीय नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी करत पदकांचा वर्षाव केला.पलक गुलिया आणि ईशा सिंग यांनी शुक्रवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. दोघांनीही एकमेकांना कडवे आव्हान देत अव्वल दोन स्थान पटकावले. १७ वर्षीय पलकने सुवर्णपदक तर ईशाने रौप्य पदक जिंकले आहे.या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने नेमबाजीत एकूण १७ पदके जिंकली ज्यामध्ये ६ सुवर्णपदकांचा समावेश आहे.

 

तर ईशाला आव्हान देणाऱ्या पाकिस्तानच्या तलत किश्मालाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.पलकचे हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिले वैयक्तिक पदक आहे.तिने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत २४२.१ स्कोअर केला.ही संख्या आशियाई खेळातील एक विक्रम आहे. बुधवारी २५ मीटर पिस्तुलमध्ये वैयक्तिक रौप्यपदक जिंकणारी ईशा १० मीटर एअर पिस्तुलमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या संघाचाही भाग होती. ईशाने वैयक्तिक अंतिम फेरीत २३९.7 गुण प्राप्त करत रौप्यपदकावर समाधान मानले.

 

भारताने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले. ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर (५९१), स्वप्नील कुसळे (५९१) आणि अखिल शेओरन (५८७) या संघात होते ज्यांनी चीनच्या आव्हानावर मात करत १७६९ स्कोअर केला. चीन १७६३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर तर दक्षिण कोरियाला कांस्यपदक मिळाले.पुरुषांच्या या त्रिकुटाने तब्बल आठ गुणांनी विश्वविक्रम मोडीत काढला.

हे ही वाचा:

कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली

तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!

‘कॅनडा म्हणजे मारेकऱ्यांचा गड’!

राजस्थानमध्येही भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?

ऐश्वरी आणि स्वप्नील यांनी वैयक्तिक फायनलमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आणि पात्रता फेरीनंतर प्रथम आणि द्वितीय स्थान मिळवले.आशियाई स्तरावर चिनी लोकांचे वर्चस्व असलेल्या खेळात यापूर्वी भारतीयांची अशी कामगिरी कधीही पाहायला मिळाली नव्हती.अखिल हा ५८७ गुणांसह पाचव्या स्थानावर असूनही अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही कारण प्रत्येक देशातून फक्त दोन स्पर्धक आठ संघांच्या अंतिम फेरीत भाग घेऊ शकतात.पुढील वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा असलेल्या स्वप्नीलने पात्रता फेरीत ५९१स्कोअर करत आशियाई विक्रम मोडीत काढला.ऐश्वर्य देखील मागे न राहता समान स्कोअर केला होता पण स्वप्नीलने अधिक इनर १० मारल्यामुळे अव्वल राहिला.स्वप्नीलकडे ३३ ‘इनर-१०’ होते, तर ऐश्वरीकडे २७ होते.फायनलमध्ये पोहोचलेले दोन चिनी – डु लिंशु आणि तियान जियामिंग याना स्वप्नील आणि ऐश्वर्य यांच्यामागे अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान मिळाले.

 

महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात १८ वर्षीय ईशा (५७९), पलक (५७७) आणि दिव्या टीएस (५७५) यांचा एकूण १७३१ स्कोअर होता. चीनने १७३६ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले, हा देखील आशियाई क्रीडा स्पर्धेतील विक्रम आहे. चायनीज तैपेईला कांस्यपदक मिळाले.ईशाने महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेतही रौप्यपदक पटकावले आहे. तर ईशा, मनू भाकर आणि रिदम संगवान यांनी सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा