‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम नव्या रुपात; नरेंद्र मोदींसोबत दीपिका पदुकोण, मेरी कोम विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन

तीन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम नव्या रुपात; नरेंद्र मोदींसोबत दीपिका पदुकोण, मेरी कोम विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोर्डाच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधतात. गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असून या माध्यमातून नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना परीक्षेमधील यशासाठी आणि परीक्षा काळात तणावमुक्त राहण्यासाठी मार्गदर्शन करतात. यंदाही हा उपक्रम राबवला जाणार असून या वर्षी हा कार्यक्रम नव्या रुपात आणि शैलीत आयोजित केला जाणार आहे.

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी केवळ नरेंद्र मोदी यांचा सहभाग नसून यंदा वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांना सहभागी करून घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दीपिका पदुकोण, मेरी कोम, अवनी लेखरा, रुजुता दिवेकर, सोनाली सभरवाल, फूडफार्मर, विक्रांत मेस्सी, भूमी पेडणेकर, टेक्निकल गुरुजी आणि राधिका गुप्ता यांचाही समावेश असणार आहे. हे विविध क्षेत्रातील यशस्वी दिग्गज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

विद्यार्थ्यांचा हा संवादात्मक कार्यक्रम, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे दरवर्षी आयोजित केला जातो. दिल्लीतील भारत मंडपम येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. या वर्षी तीन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागात लक्षणीय वाढ दिसून येत असून गेल्या वर्षी यासाठी २.२६ कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

हे ही वाचा:

काश्मीर हा पाकिस्तानचा, हिसकावून घेऊ! दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा बरळला

पाकचे पंतप्रधान म्हणतात, काश्मीरसह सर्व प्रश्न भारताशी चर्चेद्वारे सोडवायचेत

निदर्शकांनी बांगलादेशला स्वातंत्र्य देणाऱ्या शेख मुजीबुरहमान यांचे घर जाळले

ईडीकडून १९ ब्रोकिंग कंपन्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल

‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाला २०१८ मध्ये सुरुवात झाली. पहिल्या आवृत्तीपासूनचं ‘परीक्षा पे चर्चा’ हा एक लोकप्रिय कार्यक्रम बनला. परीक्षेच्या ताणावर विद्यार्थ्यांनी कसं काम करावं, विद्यार्थ्यांनी परीक्षांना एक उत्सव म्हणून पहावं यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रोत्साहित केलं जातं.

Exit mobile version