29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषउध्वस्त कोकणाला सावरण्यासाठी ठाणेकर सरसावले

उध्वस्त कोकणाला सावरण्यासाठी ठाणेकर सरसावले

Google News Follow

Related

कोकणात पावसाने तांडव घालून अनेकांचे संसार उध्वस्त केले आहेत. अशा सर्व नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी पुढे सरसावले आहेत. राज्यभरातील अनेक ठिकाणी संघाचे स्वयंसेवक आणि भाजपाचे कार्यकर्ते हे कोकणसाठी मदत गोळा करत आहे. अशाच प्रकारची मदत ही ठाणे शहरातूनही पाठवण्यात येत आहे.

बुधवार रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने कोकणाला झोडपून काढले आहे. अशा परिस्थितीत कोकणाला सावरण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा आपत्तीच्या काळात मदतीसाठी कायमच अग्रणी असतो. त्याचाच प्रत्यय आत्ताही येताना दिसते आहे. राज्यात अनेक ठिकाणी संघाचे स्वयंसेवक कोकणसाठी मदत गोळा करताना दिसत आहेत. ठाण्यातही अशा प्रकारची मदत केली जात आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील जेईईच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा

आपत्तीची दरड….

भारताने ‘ही’ मदत पाठवल्यामुळे बांग्लादेशने सोडला सुटकेचा निश्वास

कोविड मदत साहित्य पुरवण्यासाठी आयएनएस ऐरावत इंडोनेशियात

यासाठी समाजाला आवाहन करण्यात आले आहे. चादर/ब्लॅंकेट, पिण्याचे शुद्ध बाटलीबंद पाणी, रेडी टू इट प्रकारातील पदार्थ किंवा धान्य, धान्य किट – खिचडी साहित्य (केवळ – तांदूळ, डाळ, तिखट, मिठ, हळद, बटाटा, कांदा), चालू असलेली टॉर्च, मेणबत्ती – माचिस, घर स्वच्छ करण्यासाठी फ्लोअर क्लिनर, साडी, शर्ट, टीशर्ट, पँट, महिला सलवार खामिज (पंजाबी ड्रेस), लहान मुलाचे कपडे, तसेच त्यासोबतच आर्थिक मदत पाठवली जात आहे.

तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी ठाणेकडूनही कोकणसाठी मदत पाठवण्यात येत आहे. २४ जुलै, शनिवार रोजी भाजपा ठाणेतर्फे पाण्याच्या बाटल्या आणि कोरडे अन्न यांनी भरलेले दोन ट्रक हे कोकणात पाठवण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे सध्या कोकणातच ठाण मांडून आहेत. तर आगामी काळात भाजपा ठाणेतर्फे स्वयंसेवकांच्या तुकड्या कोकणात मदतकार्यासाठी जाणार असल्याचे समजते.

या सर्व कार्यात ज्या ठाणेकर नागरिकांना सहभाग नोंदवायचा आहे ते खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात किंवा आर्थिक मदत करायची इच्छा असल्यास खाली सर्व बँक तपशील देण्यात आले आहेत. (80G उपलब्ध आहे)

बॅंक विवरण:
टीजेएसबी सहकारी बैंक लिमिटेड
प्रताप व्यायाम शाळा सेवा संस्था
बचत खाते क्र.- 003110100016222
IFSC: TJSB0000003
दात्याचे तपशील – संपूर्ण नाव, पत्ता, PAN NO

संपर्क क्रमांक –
उदय लेले ९३२२९८९८००
कल्पेश देवकर ९०८२८७९३३२
निनाद मुंगी ९६१९९०३५९०

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा