सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांबद्दलच्या मागील आदेशात सुधारणा करत एक नवीन अंतरिम निर्णय दिला आहे. देशात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढत, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत म्हटलं आहे की ”लसीकरण पूर्ण झाल्यानंतर अशा कुत्र्यांना त्यांच्या मूळ भागातच परत सोडावं.”
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या मागील आदेशात बदल करत म्हटले आहे की लसीकरणानंतर, कुत्र्यांना त्यांच्या मूळ भागात सोडले जाईल, परंतु रेबीज-संक्रमित किंवा आक्रमक कुत्र्यांना सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच, रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालण्यास देखील पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी, महानगरपालिकेला (एमसीडी) कुत्र्यांसाठी विशेष खाद्य स्थाने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांची पद्धतशीरपणे काळजी घेता येईल.
न्यायालयाने म्हटले आहे की कुत्र्यांना फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच खायला दिले जाईल. याशिवाय, न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले आहे की जर कोणी या नियमांचे उल्लंघन करताना आढळले तर त्याच्यावर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल. न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास परवानगी दिलेली नाही.
न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. यासोबतच देशभरातील सर्व न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले संबंधित खटले सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश फक्त दिल्ली-एनसीआरपुरता मर्यादित होता, परंतु आता तो संपूर्ण भारतात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ही समस्या वाढली आहे, त्यामुळे कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
हे ही वाचा :
संसद भवनात घुसखोरीची घटना: भिंत ओलांडून गरुड गेटपर्यंत पोहोचलेला आरोपी अटकेत!
“पंतप्रधानांचा दौरा: बिहारमध्ये १३,००० कोटींचे प्रकल्प, कोलकाता मेट्रोला नवे टप्पे”
“भारतावर दुप्पट कर लावण्याची अंतिम मुदत २७ ऑगस्टपर्यंतच; ट्रम्प वाढवणार नाहीत”
सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय प्राणी हक्क, सार्वजनिक आरोग्य आणि कायदेशीर व्यवस्थापन यांचा समतोल राखणारा आहे. आता स्थानिक प्रशासनाची जबाबदारी वाढली असून, त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने भटक्या प्राण्यांची देखरेख करणे आवश्यक ठरणार आहे.







