गुजरातमधील कांडला येथून उड्डाण करताना एका विमानाचे चाक निखळल्याने खळबळ उडाली. यामुळे शुक्रवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. ७५ प्रवाशांसह स्पाइसजेट बॉम्बार्डियर क्यू४०० विमानाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमानतळावर लँडिंग केली.
कांडलाहून मुंबईला जाणाऱ्या स्पाइसजेट विमानाचे टेकऑफनंतर चाक धावपट्टीवरच राहिले. त्यानंतर खळबळ उडाली. यामुळे विमानाने मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. मुंबई पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमानाचे एक चाक गायब असल्याचे अधिकाऱ्यांना कळताच घबराट पसरली. मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंगसाठी आणीबाणीची घोषणा करण्यात आली. स्पाइसजेटने या घटनेनंतर निवेदन जारी केले आहे. गुजरातमधील कांडला येथून येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचे चाक टेकऑफ दरम्यान धावपट्टीवर पडल्याने मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
कांडला एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ला विमानातून वस्तू खाली पडताना दिसली. त्यानंतर त्यांनी पायलटला कळवले आणि पडलेली वस्तू आणण्यासाठी एटीसी जीप पाठवली, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर धावपट्टीवरून पडलेले चाक आणि धातूचे रिंग सापडले, असे ते पुढे म्हणाले.
हे ही वाचा :
पहिल्या मणिपूर दौऱ्यात मोदी कोणत्या घोषणा करणार?
नोबेल समिती म्हणते, ट्रम्पकडून दबाव परिणाम करणार नाही!
नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेल पेटवल्याने भारतीय महिलेचा मृत्यू
राहुल गांधी स्वतःला संविधानापेक्षा वरचढ समजतात!
दरम्यान, मुंबई विमानतळावर अग्निशमन दल आणि बचाव पथकांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते. तथापि, विमान दुपारी ४ वाजता सुरक्षितपणे उतरले. स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, “१२ सप्टेंबर रोजी कांडला ते मुंबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या क्यू४०० विमानाचे बाहेरील चाक उड्डाणानंतर धावपट्टीवर आढळले. विमानाने मुंबईकडे प्रवास सुरू ठेवला आणि सुरक्षितपणे उतरले. सुरळीत लँडिंगनंतर, विमान टर्मिनलवर पोहोचले आणि सर्व प्रवासी उतरले.”







