26 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरविशेषविजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा हा क्षण!

विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा हा क्षण!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केले संबोधित

Google News Follow

Related

भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम चांद्रयान ३ यशस्वी ठरली आणि विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर अवतरले तो क्षण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतून पाहिला. तिथून त्यांनी देशाला संबोधित करताना हा क्षण भारतासाठी विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा आहे, नव्या भारताच्या जयघोषाचा आहे अशा शब्दांत भारतीयांचे अभिनंदन केले, शास्त्रज्ञांचे कौतुक केले.

पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा आपण आपल्या डोळ्यांनी इतिहास घडताना पाहतोय जीवन धन्य होते. अशी ऐतिहासिक घटना चिरंजीव चेतना बनते. हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण अभूतपूर्व आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे हा क्षण नव्या भारताचा जयघोषाचा आहे हा क्षण. हा क्षण आव्हानांच्या महासागराला पार करण्याचा आहे हा क्षण विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा आहे. १४० कोटींच्या हृदयाच्या सामर्थ्याचा आहे. हा क्षण भारतात नवी उर्जा, नवा विश्वास नवी चेतनाचा आहे. हा क्षण भारताच्या उदयमान भाग्याच्या आगमनाचा आहे. अमृतकाळातील प्रथम प्रभेत यशाची ही अमृतवर्षा झआली आहे.  आम्ही पृथ्वीवर संकल्प केला आणि ते चंद्रावर आपण साकारले.

हे ही वाचा:

वक्फ बोर्डाच्या मालमत्तेबाबत दिल्लीतील जामा मशिदीला नोटीस

भारत चंद्रावर आहे; चांद्रयान- ३ च्या यशानंतर इस्रो प्रमुख सोमनाथन यांचे गौरवोद्गार

कांद्याचा प्रश्न मिटला, लासलगाव, सोलापूरमध्ये लिलाव सुरू

मतदानासाठी सचिन तेंडुलकर ‘नॅशनल आयकॉन’

पंतप्रधानांनी सांगितले की, आमच्या वैज्ञानिकानी सांगितले की, भारत चंद्रावर पोहोचला. आपण अंतरिक्षात नव्या भारताच्या नव्या उड्डाणाचे साक्षी बनलो आहोत. मी आता ब्रिक्स समिटमध्ये सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत आहे. पण प्रत्येक देशवासियाप्रमाणे माझे मन चांद्रयान मोहिमेकडे लागले होते. नवा इतिहास बनल्यावर प्रत्येक भारतीय जल्लोष करतो आहे. प्रत्येक घरात उत्सव आहे. मी देशवासियांसोबत या उल्हासात सामील झालो आहे. मी टीम चांद्रयानला, इस्रोला आणि देशातील सर्व वैज्ञानिकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. ज्यांनी या क्षणासाठी अनेक वर्षे परिश्रम केले. उत्साह, आनंद, उर्जा व भावनेने भरलेल्या या अद्भूत क्षणासाठी १४० कोटी देशवासियांनाही कोटी कोटी शुभेच्छा देतो.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझ्या परिवारजनांनो आमच्या वैज्ञानिकांचे परिश्रम व प्रतिभेने भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे, तिथे कुणीही गेलेले नाही. कोणताही देश जाऊ शकला नाही. आजपासून चंद्राशी जोडलेली कथानके, मिथके बदलतील. नव्या पिढीसाठी वाकप्रचारही बदलतील. भारतात आपण सगळेच पृथ्वीला आई म्हणतो आणि चंद्राला मामा म्हणतो. चंदा मामा बहुत दूर के है, असे म्हटले जात असे पण आता एक दिवस येईल जेव्हा मुले म्हणतील चंदा मामा एक टूर के है.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा