पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (२५ सप्टेंबर) राजस्थानच्या बांसवाडा शहरात दाखल झाले आणि त्यांनी राज्याला पाणी, रस्ते, आरोग्य व ऊर्जा क्षेत्रातील एकूण ₹१,२२,६७० कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट दिली. यावेळी पंतप्रधानांनी जोधपूर आणि बीकानेर ते दिल्ली कॅन्ट मार्गावर धावणाऱ्या तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
या कार्यक्रमात १५,००० युवकांना रोजगाराची संधी देण्यात आली. यापैकी प्रतीकात्मक स्वरूपात दोन युवकांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते थेट नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश तरुण पिढीला रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणे आहे.
‘कुसुम’ योजनेचे उद्घाटन
पंतप्रधान मोदींनी ‘प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियान (कुसुम) योजने’चे उद्घाटन केले आणि लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना सौर पंप व सौरऊर्जा उपकरण खरेदीसाठी अनुदान देणार आहे, जेणेकरून ऊर्जेवरील खर्चात बचत होईल आणि उत्पन्नात वाढ होईल.
पंतप्रधान मोदींनी नापला येथे जनतेला संबोधित करताना भाषणाची सुरुवात माता त्रिपुरा सुंदरी आणि माता माही यांना वंदन करून केली. त्यांनी आदिवासी समुदायाचे शौर्याचे प्रतीक म्हणून वर्णन केले आणि भाजप या समुदायासोबत उभी असल्याचे सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, भाजपच्या प्रयत्नांमुळेच आदिवासी कुटुंबातील मुलगी द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती बनली.
कॉंग्रेसवर हल्ला
काँग्रेस पक्षावर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात राजस्थान पेपर लीकचे केंद्र बनले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेसने राजस्थानला दुखावले. जल जीवन मिशन देखील भ्रष्टाचाराचे बळी ठरले. महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात झाले. बलात्काऱ्यांना संरक्षण दिले जात होते. बांसवाडामध्ये अवैध दारूचा व्यापार फोफावत होता.”
हे ही वाचा :
“भारतासोबत समस्या आहे कारण…” मुहम्मद युनूस भारताबद्दल पुन्हा बरळले
पुन्हा समीर वानखेडे विरुद्ध शाहरुख खान!
मिग- २१ ला निरोप; ऐतिहासिक फ्लायपास्टमध्ये पायलट असलेल्या स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा कोण आहेत?
कराचीत तीन ट्रान्सजेंडरच्या हत्येवर आंदोलन
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, काँग्रेस सरकारांनी कधीही विजेकडे लक्ष दिले नाही. २०१४ मध्ये जेव्हा तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली तेव्हा देशात २.५ कोटी घरे होती, ज्यांना वीज जोडणी नव्हती. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही देशातील १८००० गावांमध्ये विजेचे खांब नव्हते. देशातील मोठ्या शहरांमध्ये अनेक तास वीजपुरवठा खंडित होत असे. गावांमध्ये चार ते पाच तास वीज जात असे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०१४ मध्ये आमच्या सरकारने परिस्थिती बदलण्याचा संकल्प केला.
डबल इंजन सरकार के नेतृत्व में राजस्थान लगातार नई ऊंचाइयों को छू रहा है। आज बांसवाड़ा से हजारों करोड़ रुपये के विकास कार्यों का उद्घाटन और शिलान्यास प्रदेश की प्रगति की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है।
https://t.co/ZpKglgGMdl— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2025







