भगवे वस्त्र, हातात रुद्राक्षांच्या माळा, पंतप्रधान मोदींचे गंगा स्नान!

संस्कृत मंत्रांचा जप करत केली प्रार्थना

भगवे वस्त्र, हातात रुद्राक्षांच्या माळा, पंतप्रधान मोदींचे गंगा स्नान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (५ फेब्रुवारी) महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले. पंतप्रधान मोदिनी भगवे रंगाचे वस्त्र परिधान करून पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. पंतप्रधान मोदींनी स्नान केल्यानंतर गंगेला नमन केले आणि सूर्यदेवाला नैवेद्य दाखवला. संगमच्या काठावर गंगेची पूजा केली आणि देशवासीयांच्या कल्याणासाठी त्यांनी प्रार्थना केली.

पंतप्रधान मोदी प्रयागराज विमानतळावर उतरले आणि तेथून हेलिकॉप्टरने डीपीएस शाळेच्या मैदानावर पोहोचले. यानंतर, पंतप्रधान अरैल घाटावरून बोटीने संगम नाक्यावर पोहोचले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी त्रिवेणी संगमात रुद्राक्षाची माळ हातात धरून, संस्कृत मंत्रांचा जप करत प्रार्थना केली, त्यानंतर नेव्ही ब्लू कुर्ता, काळा जॅकेट आणि हिमाचली लोकरीची टोपी घालून आरती केलीदरम्यान, संगमच्या काठावर भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमान मंदिर अक्षयवट येथे न जाताच परतले. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी अनेक आखाड्यांमधील संतांची भेट घेवून संवाद साधणार आहेत.

पंतप्रधान मोदींचा संगम दौरा सुमारे २ तासांचा होता. सकाळी ११ ते ११:३० ही वेळ पंतप्रधान मोदींसाठी राखीव होती. पंतप्रधानांच्या महाकुंभ भेटीची विशेष तयारी कालपासूनच सुरू झाली होती. संगम घाटापासून प्रयागराजच्या रस्त्यांपर्यंत सुरक्षा प्रोटोकॉल आहेत. दुसरीकडे, महाकुंभाला भाविकांचे आगमन अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत ३८.५ कोटींहून अधिक लोकांनी संगमात स्नान केले आहे.
हे ही वाचा : 
द्वारका जिल्ह्यातील बेकायदेशीर अतिक्रमण पाडण्याविरोधातील याचिका फेटाळली
मालगाडी घसरून शिरली रहिवासी विभागात
हिंदूंच्या लग्नाच्या वरातीत मुस्लीम तरुणांचा धिंगाणा
अनधिकृत भारतीयांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान आज अमृतसरमध्ये उतरणार

पंतप्रधान मोदी आज माघ महिन्यातील अष्टमी तिथीला पवित्र त्रिवेणीत धार्मिक स्नान करत आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार, ५ फेब्रुवारी ही माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीची अष्टमी तारीख आहे, जी धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ मानली जाते. या दिवशी तपस्या, ध्यान आणि आध्यात्मिक साधना अत्यंत फलदायी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी तपश्चर्या, ध्यान आणि स्नान करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. याशिवाय, या दिवसाला भीष्माष्टमी असेही म्हणतात.

Exit mobile version