ओडिशाच्या राउरकेला येथे बुधवारी मालगाडी रुळावरून घसरून रहिवासी भागात गेल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. मालगाडी रहिवासी भागात शिरताच स्थानिक नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत तेथील नागरिक होते. केवळ पाच मीटर ही मालगाडी पुढे गेली असती तर परिसरात असणाऱ्या झोपड्या बेचिराख झाल्या असत्या. सुदैवाने अनर्थ टळला गेल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
शंटिंगचे काम सुरू असताना सकाळी सहा वाजता ही घटना घडली. शंटिंग म्हणजे निर्गमनासाठी ट्रेनमध्ये बोगी आयोजित करणे आणि वर्गीकरण करणे होय. मात्र, ट्रेन अचानक रुळावरून घसरली आणि रहिवासी विभागात शिरली. यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.
हेही वाचा..
ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक प्रकरणात आरोपींचा जामीन फेटाळला
अनधिकृत भारतीयांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान आज अमृतसरमध्ये उतरणार
मादी चित्ता ‘वीरा’ने दोन बछड्यांना दिला जन्म, संख्या २६ वर पोहोचली!
यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा दावा करणाऱ्या केजरीवालांविरोधात हरियाणामध्ये गुन्हा दाखल
परंतु धडकेमुळे ट्रेनच्या मार्गावर असलेल्या एका टेम्पोचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर रेल्वे चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार वसाहत बेकायदेशीरपणे उभारण्यात आली असून रहिवाशांना हाकलण्यासाठी ही घटना जाणूनबुजून घडवण्यात आल्याचे स्थानिकांचे मत आहे. अधिकाऱ्यांनी या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.