उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील लोणी भागात काही मुस्लिम तरुणांनी एका हिंदू व्यक्तीच्या लग्नाच्या वरातीवर हल्ला केला. अब्दुल, ताहिर, हसनैन, जुनैद, साजिद, उस्मान आणि त्याचा भाऊ एहसान अशी हल्लेखोरांची नावे आहेत. त्यांनी वरातीमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून हा प्रकार केला आहे. पीडित महिलांनी दिलेल्या माहितीनुसार या मुस्लिम तरुणांनी लग्नाच्या मिरवणुकीवर दगडफेक केली आणि काही महिलांचे मंगळसूत्रही हिसकावले. या प्रकरणी संशयित असणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. रविवारी हा प्रकार घडला.
लोणीच्या प्रशांत विहार कॉलनीत राहणाऱ्या नाहर सिंग यांच्या मुलीचे रविवारी लग्न होणार होते तेव्हा ही घटना घडली आहे. महावीर यांचा मुलगा हर्ष याच्या लग्नाची मिरवणूक कांचन पार्क कॉलनीतून आली होती. पीडित हिंदू दलित समाजातील आहेत. लोणीतील हिंदू विवाह मिरवणुकीत मुस्लिम तरुणांचा एक गट घुसला आणि त्यांनी डीजेवर नाचण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी महिलांचा विनयभंग केला. यावर वारात्यांनी आक्षेप घेतल्यावर मोठ्या संख्येने ते जमा झाले आणि मारामारीस सुरुवात केली. या प्रकारानंतर वातावरण तणावाचे होते. त्यांनी थेट दगडफेक करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा..
मालगाडी घसरून शिरली रहिवासी विभागात
ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक प्रकरणात आरोपींचा जामीन फेटाळला
अनधिकृत भारतीयांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान आज अमृतसरमध्ये उतरणार
मादी चित्ता ‘वीरा’ने दोन बछड्यांना दिला जन्म, संख्या २६ वर पोहोचली!
इतकेच नाही तर आरोपींनी लग्नाच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्याचे दागिने आणि रोकड लुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी अब्दुल, ताहिर, हसनैन, जुनैद, साजिद, उस्मान, एहसान इत्यादींनी केलेल्या हिंसाचारात सुमारे चार जण जखमी झाल्याची नोंद आहे. पीडितांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शी आणि पीडितेच्या कुटुंबातील सदस्य रजनी यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी मुस्लिम तरुण वरातीमध्ये दगड घेऊन घुसले आणि त्यांनी मिरवणुकीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. डीजेजवळ नाचणाऱ्या महिला मागे पळत असताना मुस्लिम हल्लेखोरांनी त्यांचे मंगळसूत्र आणि तिच्या मेहुणीचे मंगळसूत्र हिसकावले. तिने असेही सांगितले की त्यांनी १०० क्रमांक डायल केला, तथापि, बराच वेळ पोलिस घटनास्थळी आले नाहीत. रजनी पुढे म्हणाल्या, वराती परत येत असताना गोंधळाच्या वेळी मुस्लिम हल्लेखोर लाठ्या घेऊन परतले. जवळपास अर्धा तास हा हिंसाचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी हल्लेखोरांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
सोमवारी स्थानिक भाजप आमदार नंदकिशोर गुजर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. बदमाशांनी लग्नाच्या पार्टीला मारहाण करून लुटल्याचे आमदार म्हणाले. कठोर कारवाईसाठी त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी बोलले आहे. एसीपी लोणी सूर्यबली मोर्या यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल, ताहिर, हसनैन, जुनैद, साजिद, उस्मान आणि उस्मानचा भाऊ एहसान यांना घटनास्थळी अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू असून दरोड्याच्या आरोपात तथ्य आढळल्यास त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.