मध्य प्रदेशातील शेओपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात (केएनपी) आणखी दोन चित्त्यांच्या पिल्लांचा जन्म झाला आहे. मंगळवारी (४ फेब्रुवारी) मादी चित्ता ‘वीरा’ने दोन बछड्यांना जन्म दिला आहे. यामुळे कुनो राष्ट्रीय उद्यानातील एकूण चित्त्यांची संख्या २६ वर पोहोचली आहे. यामध्ये १४ बछडे आणि १२ प्रौढांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी नवजात बछड्यांचा फोटो शेअर करत ही बातमी दिली. मध्य प्रदेशच्या ‘जंगल बुक’मध्ये दोन चित्त्यांच्या पिल्लांचा समावेश झाला,” असे त्यांनी लिहिले. मध्य प्रदेशच्या भूमीवर चित्त्यांची संख्या सतत वाढत आहे ही माहिती शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. आज, मादी चित्ता वीराने दोन लहान पिल्लांना जन्म दिला आहे. मध्य प्रदेशच्या भूमीवर चित्त्याच्या पिल्लांचे स्वागत आहे आणि मी या लहान पिल्लांच्या आगमनाबद्दल राज्यातील जनतेचे मनापासून अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री यादव यांनी चित्ता संवर्धन प्रकल्पात सहभागी अधिकारी, पशुवैद्य आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. “त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज मध्य प्रदेश ‘चित्त्यांची भूमी’ म्हणूनही ओळखला जातो,” असे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हणाले, चित्त्यांच्या वाढत्या संख्येचा राज्याच्या पर्यटन उद्योगावर सकारात्मक परिणाम होईल. चित्त्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, मध्य प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळत आहे आणि रोजगाराची नवी दारे उघडत आहेत.
हे ही वाचा :
यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा दावा करणाऱ्या केजरीवालांविरोधात हरियाणामध्ये गुन्हा दाखल
निवडणुकीपूर्वी दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून ५ लाख रुपये जप्त
युद्धग्रस्त पॅलेस्टिनी भूभाग असलेली गाझा पट्टी ताब्यात घेऊन विकास करणार!
दिल्लीच्या तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
आम्ही चित्त्यांसह सर्व वन्यजीवांचे संवर्धन आणि पुनर्संचयित करण्यासाठी नेहमीच तयार आहोत,” असे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून आठ नामिबियन चित्ते भारतात आणण्यात आले होते. यामध्ये पाच मादी आणि तीन नर होते. आतापर्यंत एकूण १० चित्ते मरण पावलेत, ज्यामध्ये सात प्रौढ आणि तीन पिल्लांचा समावेश आहे.
नन्हें चीतों की किलकारी से फिर गूंजा कूनो.. मध्यप्रदेश की 'जंगल बुक' में 2 चीता शावकों की दस्तक…
मुझे यह जानकारी साझा करते हुए अत्यंत आनंद की अनुभूति हो रही है कि मध्यप्रदेश की धरती पर चीतों की संख्या में लगातार वृद्धि हो रही है। आज मादा चीता वीरा ने 2 नन्हें शावकों को जन्म… pic.twitter.com/fCs01pIOtP
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) February 4, 2025